Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : दिलासादायक – राज्यसरकारने सिटीस्कॅन आणि प्लाझ्माचे दर केले निश्चित … काय आहेत, नवीन दर?

महाराष्ट्र 14 न्यूज : सर्वसामान्य रुग्णांसाठी दिलासा देणारी बातमी आली आहे. राज्य सरकारने सिटीस्कॅन आणि प्लाझ्माचे दर निश्चित केले आहेत. सिटीस्कॅनचे दर 12 हजारावरुन 3 हजारांवर आणले आहेत. तर कोरोनाबाधीत रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पध्दतीने संकलित केलेल्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगसाठी (200 मि.ली.) खाजगी, विश्वस्त रक्तपेढ्या, रुग्णालयांना रुग्णाकडून साडेपाच हजार इतका कमाल दर आकारण्यास मान्यता दिली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्वीट करत याची माहिती दिली आहे.

कोरोनाच्या या संसर्ग आजाराच्या या वाढत्या संक्रमणात चाचणी करुन घेणे, त्याच्या निकालाची वाट बघत बसणे जिकीरीचे झाले असतानाच, डॉक्टर कोरोनाच्या चाचणीबरोबर (एचआरसिटी) फुफ्फुसांचा सिटीस्कॅन संशयित कोरोना रुग्णांना करायला सांगतात. त्या 10 ते 15 मिनिटाच्या सिटीस्कॅनवरुन वैद्यकीय तज्ज्ञांना रुग्णाला कोरोना आहे की नाही किंवा फुफ्फुसला किती इजा झाली आहे हे निदान करुन उपचार देणे सोपे होते. त्यामुळे सध्या बहुतेक खासगी रुग्णालयात कोरोनाच्या संशयित रुग्णांना कोरोना चाचणीसोबत पाहिलं सिटीस्कॅन करायला सांगितले जात आहे. मात्र, खासगी रुग्णालयात, तपासणी केंद्रात सिटीस्कॅनचे दर हे वेगळे असून सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत, याकरिता सिटीस्कॅनचे दर निश्चित करण्याकरिता समिती गठित करण्यात आली होती. त्यानुसार आता दर निश्चिती करण्यात आली आहे.

Google Ad

यापूर्वी शासनाने अशीच समिती स्थापन करुन कोरोनाच्या (आरटी-पीसीआर) या कोरोनाच्या चाचणीचे खासगी प्रयोगशाळेतील दर निश्चित केले होते. यामुळे सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळाला होता. त्याच पद्धतीने सिटीस्कॅनच्या बाबतीत शासन धोरण घेत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे या सिटीस्कॅनचे दर हे रुग्णालय आणि तपासणी केंद्राच्या अनुषंगाने आणि कोणत्या साधनसामुग्रीचा वापर करुन केला जात असून वेगवेगळे आहेत. हे दर 3500-1200 पर्यंत असे आहेत.

काय आहेत नवीन दर?

कोरोनाबाधीत रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पध्दतीने संकलित केलेल्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगसाठी (200 मि.ली.) खाजगी, विश्वस्त रक्तपेढ्या, रुग्णालयांना रुग्णाकडून साडेपाच हजार इतका कमाल दर आकारण्यास मान्यता दिली आहे. यापेक्षा अधिक दर आकारल्यास त्यांनी आकारलेल्या अतिरिक्त रक्कमेची परतफेड संबधित रुग्णांना करणे अनिवार्य राहणार आहे अन्यथा संबंधित रक्त पेढीचा परवाना रद्द करण्याबाबतची कारवाई करण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री टोपे यांनी सांगितले.

प्लाझ्मा संकलित करण्यासाठी लागणारे खर्च व राष्ट्रीय रक्त धोरणानुसार निश्चित केलेलल्या रक्तावरील अतिरिक्त चाचण्या/विशेष चाचण्या यासाठी आकरण्यात येणाऱ्या सेवा शुल्क हे लक्षात घेऊन दर निश्चिती केलेली आहे. त्यानुसार प्लाझ्मा बॅग (200 मिली) 5500 रुपये आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे. नॅट चाचणीसह प्लाझ्मा बॅग उपलब्ध करुन दिल्यास याचाचणीसाठी कमाल दर 1200 रुपये प्रति चाचणी (प्लाझ्मा बॅगेच्या किमती व्यतिरक्त) केमील्युमीनेसन्स तपासणी करुन प्लाझ्मा बॅग दिल्यास त्यासाठी प्रति चाचणी कमाल दर 500 रुपये (प्लाझ्मा बॅग किमती व्यतिरक्त) आकारण्यास मान्यता दिली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

70 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!