Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स : सोमवार १२ ऑक्टोबर २०२०

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज सोमवार ( दि. १२ ऑक्टोबर २०२० ) रोजी २५२ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून पिंपरी चिंचवड शहरातील २४६ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून शहारा बाहेरील ०६ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.तर ६०९ रुग्ण हे कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आहे.

आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे ०६ पुरुष – भोसरी (७४ वर्षे), मोशी (६५ वर्षे), चिंचवड (५९ वर्षे), दिघी (५७ वर्षे), वाकड (७७ वर्षे), पिंपळे गुरव (६३ वर्षे), ०३ स्त्री – अजमेरा (६८ वर्षे), चिंचवड (६६ वर्षे), घरकुल (२१ वर्षे) येथील रहिवासी आहेत.

Google Ad

पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०७ पुरुष – तळेगांव (४८ वर्षे), पिंपळगांव (६३ वर्षे), शिरुर (५८ वर्षे), चाकण (६१ वर्षे), बदलापूर (५४ वर्षे), देहूगांव (६५ वर्षे), खेड (५० वर्षे) रहिवासी आहेत.

पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा

 

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!