Google Ad
Editor Choice Pune District

पिंपळे सौदागर मधील नागरीकांच्या वतीने चिपळूण मधील पुरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणामधे मदत रवाणा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६जुलै) : सलग चालु असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि डोंगराळ भागात दरड कोसळुन चिपळूण भागामधे अस्मानी संकट कोसळले आहे.आपल्या अनेक बांधवांनी या मधे जीव गमावला आहे. अद्याप हि अनेक लोक संकटात असुन अन्नपाण्यावाचुन हे जीव हतबल बसलेले आहेत.२०००० ते २५००० नागरीकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या सर्वांना सावरण्यासाठी आपणा सर्वांना मदतीचे हात होण्याची आता गरज निर्माण झाली आहे.

अशा नागरीकांना मदत करण्याच्या उद्देशाने आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका सौ.निर्मलाताई कुटे यांच्या पुढाकाराने तसेच भा.ज.पा युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चोंधे यांच्या सहकार्याने रविवार दि.२५/७/२०२१ रोजी चिपळूण येथे पिंपळे सौदागर मधील नागरीकांच्या वतीने मोठया प्रमाणामधे जिवनावश्यक गोष्टींची मदत पाठवण्यात आली आहे

Google Ad

सदर मदत मध्यरात्री १ वाजता सुखरूपपणे चिपळूण येथिल गरदे इंग्लिश मिडीयम स्कुल येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघा च्या वतीने राबवण्यात आलेल्या रेस्क्यु कॅंप वर पोहचली आहे.

आपल्या या बहुमुल्य मदतीचा काही गरजुंना लाभ होणार आहे एक जबाबदार नागरीक म्हणुन आपण मदतीचा हात पुढे केला या बद्दल सर्व नागरीकांचे आभार देखील नगरसेविका सौ.निर्मलाताई कुटे यांनी मानले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

19 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!