Google Ad
Editor Choice

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्धांचा ‘ देवदूत पुरस्काराने सन्मान

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. 25 जुलै 2021) :  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ६१व्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पिंपरी चिंचवड शहर शाखेच्या वतीने कोरोना काळात ज्यांनी जिवाची पर्वा न करता जनमानसासाठी अमूल्य असे योगदान दिले अशा लढवय्या योद्ध्यांचा शिवसेना शहर शाखेच्या वतीने महासंसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यांच्या शुभहस्ते ‘देवदूत’ पुरस्कार देऊन सन्मानित केले.

याप्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, संपर्क प्रमुख वैशाली सूर्यवंशी, शिवसेना पिंपरी चिंचवड शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले, विधानसभा प्रमुख अनंत कोराळे, युवा सेनेचे शहरप्रमुख विश्वजीत बारणे, कामगार नेते इरफान सय्यद, उपजिल्हा संघटिका वैशाली मराठे, शहर संघटिका अॅड. उर्मिला काळभोर, विधानसभा संघटिका अनिता तुतारे, माजी शहर संघटिका सुनिता चव्हाण, विभाग संघटिका शारदा वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

कार्यक्रमाचे आयोजन उपशहरप्रमुख सुधाकर नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश झिळे, राजेंद्र पालांडे, सागर शिंदे, सुनील पालकर, सचिन नलावडे, अमित फडतरे, संजय संधू, प्रशांत तरवटे, चेतन शिरसाठ, अनिरुध्द पालांडे, गौरव केरकर, सचिन कुळे, किरण सोनार आदींनी केले.

यावेळी कोरोना योद्धांचे कौतुक करताना उपशहरप्रमुख नलावडे म्हणाले की, मागील दोन वर्षांपासून देशातील परिस्थिती पाहता देशसेवेसाठी पोलीस,डॉक्टर, सफाई कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते हे दिवस-रात्र झटत आहेत. एकही सुट्टी न घेता हे कर्मचारी जीवाची बाजी लावत आहेत. त्यामुळेच त्यांचं कौतूक करावं तितकं कमी आहे. त्यांच्या याच परिश्रमामुळे या ‘देवदूत पुरस्कारा’च्या माध्यमातून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

81 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!