Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

१०० % कचरा अलगीकरण करण्यामध्ये प्रभाग क्र . ३१ मधील राजीवगांधीनगर झोपडपट्टी ठरली अव्वलस्थानी .

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६जुलै): पिंपरी चिंचवड शहरात १००% कचरा अलगीकरण करण्यामध्ये प्रभाग क्र. ३१ मधील राजीवगांधीनगर झोपडपट्टी ठरली अव्वलस्थानी.
झोपडपट्टीतील रहिवाशी करताहेत १००% कचरा अलगीकरण, वैयक्तिक घरे आणि सोसायटींनो बोध घ्या.

घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी कायदा अंतर्गत कचरा निर्माण करणा-यानेच कचरा निर्माण ठिकाणी स्तरावर कचरा अलगीकरण करणे कायद्याने बंधनकारक आहे. त्याची अंमलबजावणी आज राजीवगांधीनगर झोपडपट्टी परिसरामधील संपूर्ण नागरिकांनी करुन समाजामध्ये एक आदर्श दाखवून दिलेला आहे. राजीवगांधीनगर झोपडपट्टी परिसरातील सर्व नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी, आरोग्य विभाग कर्मचारी यांनी सदर परिसर नुकताच कचराकुंडीमुक्त केलेला आहे.

Google Ad


व्हॉट्स ऍ़प ग्रुप मार्फत केली जनजागृती. जनजागृतीतुन झाली क्रांती.
राजीवगांधीनगर झोपडपट्टी कचरामुक्त करण्याकामी, वैयक्तिक शौचालय/सामुदायिक शौचालय स्वच्छता कामी, परिसरातील आरोग्य विषयक समस्या जाणून घेण्यासाठी स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रभाग क्रमांक ३१ मधील नगरसेवक या सर्वांचा “मिशन राजीवगांधीनगर” या नावाने व्हॉट्स ऍ़प ग्रुप प्रभाग क्र. ३१ चे आरोग्य निरीक्षक उध्दव डवरी यांनी तयार केला आहे. चांगल्या कामाला हातभार लोकसहभागातून मिळावा हाच या ग्रुपचा उद्देश असल्याचे श्री डवरी यांनी सांगितले. वसाहतीतील आरोग्याचे प्रश्न व इतर समस्या सोडवण्याकरिता याचा वापर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बघता बघता कोणताही मोबदला किंवा कसलीही फळाची अपेक्षा न ठेवता केवळ समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतुन सदर वसाहतीतील काही मुले/नागरिक स्वच्छाग्रही म्हणून काम करण्यास इच्छुक झालेदेखील व प्रभागातील स्वच्छतेसाठी स्वत:हून पुढाकार घेवू लागले. सदर मुलांनी/नागरिकांनी संपूर्ण वस्ती प्रभागातील आरोग्य निरीक्षक उध्दव डवरी, आरोग्य सहाय्यक रवि रोकडे, आरोग्य कर्मचारी सिध्दार्थ जगताप, विजय केदारी, दिलीप नाईकनवरे, विनोद कांबळे यांचेसमवेत राजीवगांधीनगर वसाहतीतील प्रत्येक घरात जावून कचरा अलगीकरणाबाबत सूचना दिल्या. याआधीदेखील सदर वसाहतीतील नागरिकांकडून प्रभाग क्र. ३१ मधील आरोग्य विभागामार्फत कचरा अलगीकरणाबाबत हमीपत्रावर स्वाक्षरी देखील घेण्यात आल्या होत्या.

सदर वस्तीमध्ये एकूण १० लहान रस्ते असल्याने त्याठिकाणी घंटागाडी पोहोचणे अशक्य आहे त्यामुळे सदर ठिकाणी वस्तीमध्ये कचरा गोळा करण्याकरिता दोन महिला ढकलगाडीने सदर कचरा गोळा करण्याचे काम करित आहेत. त्यांचेकडे आज दिनांक २६/०९/२०२१ रोजी ५४० किलो ओला कचरा, सुका कचरा अंदाजे ३५० किलो तसेच सॅनिटरी पॅड, डायपर यांसारखा घातक कचरा ७ किलो सदर भागातुन जमा झाला आहे.

स्वच्छ भारत अभियानाचा मुख्य पाया हा कचरा अलगीकरण करण्याचा विषय आहे याशिवाय उद्दिष्टपूर्ती होणे जवळजवळ अशक्य आहे यासाठी राजीवगांधीनगर वसाहतीतील स्वेच्छेने सदर कामाकरता तयार झालेले वसाहतीतील मुले/नागरिक तसेच आरोग्य निरीक्षक उध्दव डवरी व प्रभागाचे आरोग्य कर्मचारी कचरा अलगीकरण करण्यासाठी सर्व स्थानिक रहिवाशांना गेले दोन दिवसांपासून संबोधित करत आहेत. तीन दिवसांत घरोघरी फिरुन वसाहतीतील जवळजवळ ४०० रहिवाशांनी १००% कचरा अलगीकरण करून स्वच्छ भारत अभियान उद्दिष्टपूर्तीस हातभार लावलेला आहे. जर अशा वसाहतीमध्ये हे घडू शकते तर इतरांनीही वैयक्तिक घरांनी तसेच सोसायटींनी कच-याकडे समस्या म्हणून न पाहता उत्तर शोधले पाहिजे. यापुढे प्रभागामध्ये कचरा अलगीकरण कामकाजाबाबत प्रभावीपणे अंमलबजावणी करणार आहे. याकामी प्रभागातील सर्व नगरसेवक यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे यावेळी दिसून आले, तसेच सदर कामाचा आग्रह त्यांनीदेखील धरला असल्याचे आरोग्य निरीक्षक उध्दव डवरी यांनी यावेळी सांगितले.

सर्व स्वच्छाग्रही यांचे खूप खूप आभार मानले. खरंच वस्तीतील मुलेही आमच्यासोबत खूप छान काम करत आहे. त्यांचे सर्वांचे कौतुक श्री डवरी यांनी केले आहे. सदर कामकाज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी अनिल रॉय, विजयकुमार थोरात ह क्षेत्रीय अधिकारी, रमेश भोसले सहा आरोग्याधिकारी आणि महेश आढाव मुख्य आरोग्य निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

स्वेच्छाग्रही नागरिकांच्या प्रतिक्रीया-
नागरिकांना ओला कचरा- सुका कचरा म्हणजे नेमके काय तेच माहित नव्हते. कारण बहुतांश लोक ही अशिक्षित आहेत. हवा, पाणी, जमिन यांचेशी कोणतेही वस्तु/पदार्थाचा संपर्क आलेस जर ती वस्तु कुजते तो म्हणजे ओला कचरा आणि जे कुजत नाही तो म्हणजे सुका कचरा अशा साध्या सोप्या शब्दांत उध्दव डवरी साहेबांनी सांगितल्याने आम्हालाही ते माहित झाले. तसेच यापुढेदेखील आम्ही स्वच्छतेकामी आरोग्य विभागास नेहमीच सहकार्य करु.
आश्विन प्रदीप खुडे (स्वेच्छाग्रही) ९८३४५८२६३४

मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असून मला समाजकार्यात काम करत असल्याचा आनंद या माध्यमातुन मिळाला. तरी आमच्या रोजगार निर्माणाकरिता महानगरपालिकेने काहीतरी करावे, आम्ही स्वच्छतेकामी नेहमी कामात पुढाकार घेवू व सोबत काम करु.
करण विजय मिसाळ (स्वेच्छाग्रही) ८४२१९५९२७१

कचराकुंडी महानगरपालिकेने काढली. खुप घाण वास परिसरात यायचा. आता कसंलाही त्रास नाही. आाणि आरोग्य कर्मचारींसोबत काम करत असताना त्यांचेदेखील अडचणी समजल्या. कायमस्वरूपी याचे भान लक्षात राहील आणि आम्ही चांगले काम करिन.
करण महादेव गायकवाड (स्वेच्छाग्रही) ७४१०७८१६६०
अजय देडे (स्वेच्छाग्रही) ८९५६५१८१६४

Google Ad

About the author

Maharashtra14 News

25 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!