Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर नागरीक , ठेकेदार व इतरांना प्रवेश बंद … ई मेल, व्हाट्सअप्प चा करावा लागणार वापर!

महाराष्ट्र 14 न्यूज,( दि. ३० मार्च ) : महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणूचा ( Covid – 19 ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ हा दि .१३ मार्च २०२० पासून लागू केलेला असून तशी अधिसूचना निर्गमित केली आहे . कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी व पॉझीटीव्ह रुग्णांची झपाटयाने होणारी वाढ विचारात घेता महानगरपालिका स्तरावर खालील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत .

१. प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी पिपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारतीत / विविध क्षेत्रीय कार्यालयांत / विभागीय कार्यालयात येणा – या अभ्यांगत / नागरीकांना ( निर्वाचित सदस्य , पदाधिकारी वगळून ) अत्यावश्यक काम वगळता कार्यालयात येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे . तथापि , बैठकी करीता निमंत्रित केलेल्या नागरिकांना संबंधित विभाग / कार्यालय प्रमुख यांनी प्रवेश पत्र देण्याची व्यवस्था करावी .

Google Ad

२. अभ्यांगत / नागरिक इ . यांनी प्रत्यक्ष कार्यालयात न येता आपले म्हणणे / तक्रारी / सुचना ह्या लेखी स्वरुपात ई – मेल व्दारे सोबत जोडलेल्या यादीनुसार त्या – त्या विभागास पाठवीणेत याव्यात ,

३. पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य इमारत / विविध क्षेत्रिय कार्यालये / विभागीय कार्यालये यांनी त्यांचेकडील अत्यंत तातडीचे टपाल , संदेश हे ई – मेल व्दारे पाठविण्यात यावेत .

४. करसंकलन विभागीय कार्यालये व क्षेत्रीय कार्यालयातील करभरणा विषयक कामकाज वगळता महानगरपालिका अधिनस्त सर्व कार्यालयांमध्ये नागरीक , ठेकेदार व इतरांना प्रवेश निषिध्द करण्याचे आदेश देत आहे .

५. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रक क्र . समय २०२० / प्र.क्र .३५ / १८ ( रवका ) दि .५ जुन २०२० अन्वये शासनाने लॉकडाऊनच्या अनुषंगाने राज्यात शासकीय कामकाजासाठी ई – मेल व व्हॉट्सअपचा वापर ग्राहय धरण्याबाबत सूचना निर्गमित केलेल्या असून नागरीक , ठेकेदार व इतर यांनी महानगरपालिका सेवेशी संबंधित कामकाजाकरीता ई – मेल व व्हॉट्सअपचा वापर करावा . वरील माध्यमांव्दारे प्राप्त अर्ज , निवेदने , तक्रारींबाबत संबंधित विभागांनी त्वरीत कार्यवाही करुन त्याच माध्यमांव्दारे संबंधितास कळविण्यात यावे .

असे आयुक्त राजेश पाटील पिंपरी चिंचवड महानगरपालिका , पिंपरी यांनी कळविले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!