Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

‘समृद्ध जीवन’च्या संचालकांना ‘ सीआयडी’नं ठोकल्या बेड्या … तर ५ वर्षांपासून होते फरार

महाराष्ट्र 14 न्यूज : गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ‘समृद्ध जीवन फ्रुट्‌स इंडिया प्रा. लि.’ आणि समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टी पर्पज कंपनी’च्या दोन संचालकांना अटक करण्यास राज्य गुन्हे अन्वेषण विभागास (सीआयडी) यश आले आहे. या गुन्ह्यात महत्त्वाची भूमिका असलेले हे दोघे गेल्या पाच वर्षांपासून फरार होते. दोघांना पुण्यातूनच अटक करण्यात आली आहे.

ऋषिकेश वसंत कणसे (वय 30) आणि सुप्रिया वसंत कणसे (वय 36, दोघे रा. पुणे) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. विशेष सत्र न्यायालयाने त्यांना सात दिवसांची कोठडी सुनावली आहे. समृद्ध इंडिया फ्रुट्‌स प्रा. लि. व समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टी पर्पज को. ऑप. सोसायटी या कंपनीने पशुधन विक्री, संगोपन तसेच खरेदी आणि विक्री यासारख्या विविध योजना सुरू केल्या. कमिशनवर एजंटची भरती केली. तसेच अनेक कार्यक्रम आयोजित केले. कमी वेळेत मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदार आणि ठेवीदारांकडून ठेवी स्वीकारल्या आणि त्यांचे पैसे आणि परतावा परत न करता तब्बल तीन हजार 500 कोटी रुपयांचा अपहार केला.

Google Ad

या फसवणूकप्रकरणी राज्यात विविध ठिकाणी आरोपीविरोधात चार गुन्हे दाखल आहेत. सीआयडीचे अपर पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, आर्थिक आणि गुन्हे शाखेचे पोलिस उपमहानिरीक्षक जालिंदर सुपेकर, पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक उत्तम वाळके, पोलिस निरीक्षक शैलजा बोबडे, वनिता धुमाळ, पोलिस कर्मचारी बाजीराव कुंजीर, प्रशांत पवार, राहुल कदम, निनाद माने, भूषण पवार आणि कविता नाईक यांच्या पथकाने ही कारवाई केली.

233 कोटींची मालमत्ता जप्त :-

या प्रकरणात यापूर्वी पोलिसांनी समृद्ध जीवन कंपनीचा सर्वेसर्वा आणि मुख्य आरोपी महेश मोतेवार, वैशाली मोतेवार, लीना मोतेवार, प्रसाद पारसवार, सुवर्णा मोतेवार, अभिषेक मोतेवार आणि विशाल चौधरी यांच्यासह इतर आरोपींना अटक केलेली आहे. या गुन्ह्यात एकूण 25 आरोपी आहेत. आत्तापर्यंत 233 कोटी 33 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!