Google Ad
Editor Choice Pune

Pune : पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये 50 ऑक्सिजन बेड तयार , नवीन रुग्णांना प्रवेश सुरु

महाराष्ट्र 14 न्यूज : मोठा गाजावाजा करत सुरु झालेलं पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटर गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलं होतं. नुकतंच या जम्बो कोव्हिड रुग्णालयात 50 ऑक्सिजन बेड तयार करण्यात आले आहेत. याशिवाय उद्यापासून आणखी 25 ऑक्सिजन बेड, 5 आयसीयू, तर 5 व्हेंटिलेटर बेड तयार करण्यात येणार आहेत. यामुळे उद्या संध्याकाळपर्यंत एकूण 85 बेड तयार होतील. पुण्यातील कोव्हिड सेंटरमध्ये नवीन रुग्णांना प्रवेश देण्यास आज (10 सप्टेंबर) सुरुवात करण्यात आली आहे.

आज चार रुग्णांना प्रवेश देण्यात आला. तसेच, ‘जम्बो’मध्ये उपचार घेऊन बरे झालेल्या 14 रुग्णांना आज घरी सोडण्यात आले, अशी माहिती अतिरिक्त मनपा आयुक्त आणि जम्बो सेंटरच्या कार्यकारी अध्यक्षा रुबल अग्रवाल यांनी दिली. जम्बो कोविड रुग्णालयाची यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मंगळवारी (8 सप्टेंबर) पुणे महापालिका प्रशासनाच्या वतीने महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांनी येथे भेट देऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.

Google Ad

यावेळी रुबल अग्रवाल ऑक्सिजन बेडची संख्या आणि रुग्णालयाची एकूण क्षमता वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे 50 ऑक्सिजन बेड आज सुरु करण्यात आले. मागील आठवड्यात 2 सप्टेंबरपासून नवीन रुग्णांना प्रवेश देण्यात आला नव्हता. मात्र, आता प्रवेश सुरू करण्यात आले आहेत. ‘या 50 बेड व्यतिरिक्त जम्बो कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडसाठी आवश्यक ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन येथे 11 किलो ऑक्सिजनचा साठा असणारी टाकी सुसज्ज करण्यात आली आहे. अशी माहिती रुबल अग्रवाल यांनी दिली.

जम्बोमध्ये बरे झालेल्या 20 रुग्णांना बुधवारी, तर 14 रुग्णांना गुरुवारी घरी सोडण्यात आले. ‘जम्बो’मध्ये उपचार घेऊन आतापर्यंत एकूण 66 रुग्ण बरे झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांशी टॅब्लेट फोनद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संपर्क करण्याची सुविधेचा लाभ नातेवाईक घेत आहेत. दिवसातून एकदा एका नातेवाईकाला रुग्णाशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधता येतो. या सुविधेबद्दल नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

6 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!