Google Ad
Editor Choice Technology

गांजा ड्रग्ज नव्हे तर औषध … धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवले … भारतासह २७ देशांचं समर्थन, पाकिस्तानचा मात्र विरोध!

महाराष्ट्र 14 न्यूज : जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आलेल्या शिफारशीनंतर संयुक्त राष्ट्राच्या अंमलीपदार्थ आयोगाने गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवलं आहे. या ऐतिहासिक मतदानानंतर गांजाच्या औषधी व उपचारात्मक क्षमतेची पडताळणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असं संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटलं आहे.

सध्या 50 पेक्षा जास्त देशांनी गांजाचं वैद्यकिय महत्त्व समजून घेत गांजाला वैध ठरवलं आहे. कॅनडा, उरूग्वे आणि अमेरिकेच्या 15 राज्यांमध्ये वैद्यकिय कारणासाठी गांजाला परवानगी देण्यात आली आहे. 27 देशांनी गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्यासाठी समर्थन दिलं तर उर्वरित देशांनी याविरोधात मतदान केलं आहे. भारतानेही गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्याच्या समर्थनार्थ मतदान केलं. चीन,पाकिस्तान आणि रशिया यांसारख्या 25 देशांनी विरोधात मतदान केलं.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!