Google Ad
Editor Choice Maharashtra

Pune : भाजपच्या घटक पक्षाचा मोठा नेता शरद पवारांना भेटला? बसू शकतो मोठा धक्का …

महाराष्ट्र 14 न्यूज : शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारने भाजपला जोरदार हादरा दिला. या धक्क्यातून भाजप सावरत नाही तेच आता एका मित्र पक्षाने झटका दिला आहे. भाजपच्या घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची गुप्त भेट घेतली आहे.

महादेव जानकर यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीच्या 3 डिसेंबर रोजी ही भेट झाल्याची माहिती समोर आली आहे.  पुण्याजवळील व्हिएसआय इनस्टिट्युटमध्ये महादेव जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेतील. दोन्ही नेत्यामुळे बऱ्याच वेळ चर्चा झाली. मात्र, ही भेट कशासाठी होती आणि चर्चेचा तपशील काय होता, याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही.

Google Ad

विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपचे अनेक आमदार आणि नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे असा दावा केला होता. नुकतेच एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपला खिंडार पडले आहे. पदवीधर निवडणुकीमध्येही भाजपमध्ये बंडखोरी उफाळून आली होती.

बीडमध्ये भाजपचे माजी खासदार आणि राज्यमंत्री जयसिंग गायकवाड यांनी जाहीरपणे भाजपवर नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. राज्यात आता मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. धनगर समाजाचे प्रमुख नेते असलेले महादेव जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!