Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

भारतीय जैन संघटना उत्कृष्ठ कार्य गौरव पुरस्कार २०२० … भारतीय जैन संघटनेचे पिंपरी चिंचवड शाखा जिल्हाध्यक्ष विरेश छाजेड यांना जाहीर

महाराष्ट्र 14 न्यूज : भारतीय जैन संघटना, महाराष्ट्र राज्य अधिवेशना मध्ये उत्कृष्ठ कार्य गौरव पुरस्कार पिंपरी चिंचवड अध्यक्ष विरेश छाजेड यांना जाहीर करण्यात आला आहे.

भारतीय जैन संघटना राज्य अधिवेशन रविवार दि.६ डिसेंबर रोजी ऑनलाईन संपन्न झाले. या राज्य अधिवेशनास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री शांतिलालजी मुथा, राष्ट्रीय अध्यक्ष श्री. राजेंद्रजी लुंकर, राज्य अध्यक्ष हस्तीमलजी बंब, श्री.वल्लभजी भंसाली, श्री. अभयजी फिरोदिया, आदी मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

राज्यात भूकंप, महापूर, शेतकरी आत्महत्या, करोना महामारी अश्या नैसर्गिक आपत्ती च्या काळात भारतीय जैन संघटनेचे कार्यकर्ते अहोरात्र राष्ट्रभक्ती भावनेने काम करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. भारतीय जैन संघटना तर्फे मुल्यवर्धन शिक्षण, अल्पसंख्यांक दर्जाचे फायदे यावर कार्यशाळा, बिझनेस डेव्हलोपमेंट, स्मार्ट गर्ल कार्यक्रम इत्यादी कार्य सुरु आहेत.

करोना महामारी च्या कालावधीत भारतीय जैन संघटनेच्या पिंपरी चिंचवड शाखेने रक्तदान उपक्रमात सुमारे १५०० पेक्षा जास्त बाटली रक्त संकलन केले. तसेच पिंपरी चिंचवड मनपा आणि फोर्स मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड मध्ये ” डॉक्टर आपल्या दारी” या उपक्रमात सुमारे ६५००० पेक्षा जास्त नागरिकांची प्राथमिक तपासणी करून मोफत औषध वाटप केले आहे. संघटनेने अर्सेनिक अल्बम गोळी, मास्क,सॅनिटायझर वाटप असेही निरनिराळे उपक्रम केले.

यासह सर्व कार्याची दखल घेऊन भारतीय जैन संघटना उत्कृष्ट कार्यगौरव पुरस्कार २०२० पिंपरी चिंचवड शाखा जिल्हाध्यक्ष विरेश छाजेड यांना संघटनेचे राज्य अध्यक्ष मा. हस्तीमलजी बंब यांनी जाहीर केला. भविष्यात देखील संघटनेचे असेच कार्य सुरु राहील असे भाव विरेश छाजेड यांनी व्यक्त केले. शुभम कटारिया, अतुल बोरा, राहुल डागा, नयन शाह, संदेश गदिया, आदित्य नहार इत्यादी कार्यकर्त्यांनी सर्व कार्यात मदत आणि सहकार्य केले तसेच पुणे विभागीय अध्यक्ष श्री. राजेंद्रजी सुराणा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असे विरेश छाजेड यांनी सांगितले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!