Google Ad
Editor Choice Health & Fitness Maharashtra

Aurangabad : ब्रिटनमधील ‘ स्ट्रेन’चा भारतात शिरकाव … पण, एकही रुग्ण राज्यात नाही – राजेश टोपे

महाराष्ट्र 14 न्यूज : गेला आठवडाभर गाजत असलेला नवीन प्रजातीच्या कोरोनाच्या विषाणूचा अखेर भारतात शिरकाव झाला आहे. सर्वाधिक वेगाने संक्रमित होणाऱ्या या विषाणूच्या भारतातील प्रवेशामुळे देशभरातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. महाराष्ट्रात कुठेही नवीन विषाणूचा रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

युरोप खंडातील बहुतांश देश तिसऱ्या लॉकडाऊनवर गेले आहेत. तेथे कठोर लॉकडाऊन केले जात आहे. आपण त्या स्टेजवर जाऊ नये, असे राज्यातील जनतेला वाटत असेल तर स्वयंशिस्त पाळावी लागेल, आरोग्य यंत्रणेला काम करायला एक मर्यादा राहील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

Google Ad

पुण्यातील एनआयव्ही येथे 43 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. मात्र राज्यात ‘यूके’तील स्ट्रेनचा एकही रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असं राजेश टोपे यांनी सांगितलंय. या स्ट्रेनचा संसर्गाचा वेग 70 पटीने अधिक आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे, असंही राजेश टोपे म्हणाले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!