Google Ad
Celebrities Editor Choice Maharashtra

‘खुलता खळी खुलेना’ फेम ‘अभिनेत्रीच्या पतीची नांदेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या …

महाराष्ट्र 14 न्यूज : ‘खुलता खळी खुलेना’ फेम अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीने नांदेडमध्ये आत्महत्या केली आहे. उदयोन्मुख अभिनेता आशुतोष भाकरे याने वयाच्या ३२ व्या वर्षी नांदेडमध्ये राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं. आशुतोषने आत्महत्या का केली, यामागील कारण अस्पष्ट आहे. या घटनेने मयुरी देशमुखच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आशुतोषचे आई-वडील नांदेडमधील ख्यातनाम डॉक्टर आहेत.

मयुरी आणि आशुतोषमध्ये कोणतेही मतभेद नव्हते, असं त्यांच्या जवळचे मित्र सांगतात. लॉकडाऊनमध्ये दोघेही एकत्र होते. सध्या मयुरीही नांदेडमध्येच असल्याचं समजतंय. नांदेडमधील गणेश नगर इथल्या घरी मयुरी आणि आशुतोषची आई घरात गप्पा मारत बसल्या होत्या. त्यावेळी आशुतोष वरच्या खोलीत होता. बराचवेळ झाला आशुतोष खाली आला नाही. त्यावेळी त्याचा दरवाजा ठोठावल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने, दुसऱ्या बाजूने खोलीत डोकावून पाहिलं. त्यावेळी आशुतोष लटकलेल्या अवस्थेत दिसला आणि एकच थरकाप उडाला.

Google Ad

आशुतोषने फेसबुरवर काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओतील व्यक्ती माणूस आत्महत्या का करतो? याबाबत विश्लेषण करताना दिसत होती. मात्र, तरीही आशुतोष इतका टोकाचा निर्णय घेईल, अशी कुणाला कल्पना नव्हती. आशुतोष गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्याने आज (२९ जुलै) सकाळी ११ ते १२ वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतील भूमिकेने मयुरी प्रसिद्धीच्या झोतात आली. मयुरीने लिहिलेले-दिग्दर्शित केलेले नाटक ‘डिअर आजो’ने प्रचंड लोकप्रियता मिळवली. तिचे तिसरे बादशहा हम हे नाटक सुरु होते. आशुतोषने ‘भाकर’, ‘इच्यार ठरला पक्का’ या चित्रपटात काम केलं आहे. आशुतोष आणि मयुरी देशमुख २१ जानेवारी २०१६ रोजी लग्नबंधनात अडकले होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

25 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement