Google Ad
Editor Choice Pune

Pune : कमवा व शिका योजनेसाठी विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते नियुक्ती आदेश!

महाराष्ट्र 14 न्यूज : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या कमवा व शिका या नावीन्यपूर्ण योजनेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले .

विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात झालेल्या या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकामराज्यमंत्री दत्तात्रय भरणे , जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे , आमदार सुनील शेळके , जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे , समाज कल्याण विभागाच्या सभापती सारिका पानसरे , बांधकाम विभागाचे सभापती प्रमोद काकडे , कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती रवींद्र वायकर , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद , जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार आदी उपस्थित होते . गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांना ‘ कमवा व शिका ‘ या नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्ह परिषदेमध्ये तीन वर्षांसाठी प्रशासकीय कामाचा अनुभव आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे .

Google Ad

या योजनेंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना मासिक मानधन देण्यात येणार आहे . जिल्हा परिषदेच्या विविध विभागात सलग तीन वर्षे प्रशासकीय कामाचा अनुभव त्यांना घेता येणार आहे . यासोबतच त्यांना तीन वर्षांनंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामधून व्यवस्थापन शाखेची पदवी मिळणार असून , सोबत मानधनदेखील मिळणार आहे .

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!