Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड शहराच्या कामकाजासाठी … प्रशासक राजेश पाटील यांनी दिली इतक्या कोटींच्या कामाला मंजुरी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ३१ मे २०२२) : पिंपरी शहरात विविध विकास कामांकरिता येणा-या अंदाजे २ कोटी १० लाख ९० हजार रुपयांच्या खर्चास आज प्रशासक राजेश पाटील यांनी मंजुरी दिली.

स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना मंजुरी देण्यासाठी आज प्रशासक राजेश पाटील यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये प्रशासकीय बैठक पार पडली. या बैठकीस विषयाशी संबंधित अधिकारी आणि विभागप्रमुख उपस्थित होते.

Google Ad

प्रभाग क्र. १० आणि प्रभाग क्र. २५ मधील जलनिःसारण नलिका सुधारणा विषयक कामाकाजाकरिता येणा-या ३८ लाख ३५ हजार रुपयांच्या खर्चास प्रशासक राजेश पाटील यांनी मंजुरी दिली.

मनपाच्या विविध रुग्णालयांमध्ये ऑपरेशन थिएटरकरिता आवश्यक १२ नग मशिनच्या खरेदीकामी आवश्यक ६३ लाख ९१ हजार प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

भक्ती शक्ती चौक ते निसर्ग दर्शन सोसायटी पर्यंतच्या रस्त्याच्या स्थापत्य विषयक कामकाजासाठी येणा-या सुमारे १ कोटी ९ लाख ४० हजार रुपयांच्या खर्चास देखील आजच्या बैठकीत प्रशासक पाटील यांनी मंजुरी दिली.

मनपाच्या स्थायी आस्थापनेवरील गट ब व क संवर्गातील रिक्त पदांचे ऑनलाईन परीक्षेचे कामकाज टीसीएस या संस्थेस देण्याबाबत महापालिका सभेची मान्यता घेण्याकामी सदरचा विषय महापालिका सभेकडे पाठविण्यास या बैठकीमध्ये शिफारस करण्यात आली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!