महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज शनिवार ( दि. १५ ऑगस्ट २०२० ) रोजी ९७८ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून पिंपरी चिंचवड शहरातील ९६३ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून शहारा बाहेरील १५ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तर आज ७०५ रुग्ण हे कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.
आज मृत झालेले रुग्ण स्पाईन रोड मोशी (पुरुष ६६ वर्षे), रामनगर आकुर्डी (स्त्री ५५ वर्षे), रुपीनगर (पुरुष ५५ वर्षे), थेरगाव (स्त्री ६२ वर्षे, पुरुष ६० वर्षे), निगडी (पुरुष ७१ वर्षे), संभाजीनगर (स्त्री ४४ वर्षे), काळेवाडी (पुरुष ७३ वर्षे, पुरुष ७१ वर्षे), किवळे (स्त्री ६५ वर्षे), निगडी प्राधिकरण (पुरुष ७३ वर्षे), मोरवाडी (पुरुष ७० वर्षे), मिलिंदनगर (पुरुष ६० वर्षे), वाकड (पुरुष ६० वर्षे), नेहरुनगर (पुरुष ५० वर्षे), भोसरी (पुरुष ६८ वर्षे), नवी सांगवी (स्त्री ५७ वर्षे), पिंपरी (स्त्री ७० वर्षे), चिखली (पुरुष ७० वर्षे), खेड (पुरुष ६९ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.
19 Comments