महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २६ एप्रिल २०२२) : स्थायी समितीची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना आज झालेल्या बैठकीत प्रशासक राजेश पाटील यांनी मंजुरी दिली. यामध्ये विविध विकासकामांसाठी होणा-या सुमारे ३ कोटी १ लाख ९० हजार रुपयांच्या खर्चाचा समावेश होता.
प्रशासक राजेश पाटील यांच्या उपस्थितीत आज महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये बैठक संपन्न झाली. बैठकीस विषयाशी संबंधित अधिकारी आणि विभागप्रमुख उपस्थित होते. मंजूर केलेल्या विषयांमध्ये ८ क्षेत्रीय कार्यालयातील उद्याने/रस्ते/वृक्ष देखभाल कामासाठी मजूर पुरवणे, सेक्टर १०, गवळीमाथा, लांडेवाडी, दिघी, च-होली व बोपखेल येथील शुद्ध पाणीपुरवठा करणा-या पंपहाऊसचे दुरुस्ती विषयक कामकाज करणे, महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमधील ऑपरेशन थिएटरकरिता हायड्रोलिक टेबल खरेदी करणे, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागासाठी आवश्यक विविध प्रकारचे साफसफाई साहित्य खरेदी करणे इत्यादी विषयांचा समावेश आहे.