महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१०जून) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सावतामाळी मंदिर , बनकर वस्ती येथे प्रा.सौ कविता ताई आल्हाट(पुणे जिल्हा निरीक्षक) व राष्ट्रवादी महिला संघटने तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या प्रसंगी मा. नगरसेवक अरुण बोऱ्हाडे , मा.नगरसेविका.सौ मंदाताई आल्हाट , शहर उपाध्यक्षा सौ.सपना ताई घाडगे , भोसरी कार्याध्यक्ष सौ .संगीताताई आहेर, सौ.उषाताई ठाकूर, सौ.राजश्रीताई बोऱ्हाडे, सौ.सरिताताई झिब्रे,सौ.सूनिताताई आल्हाट, सौ.संगीताताई गुळवे, सौ.सुधा खोले,सौ अंकिता साबळे, ज्योती मधुलकर तसेच सावतामाळी मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष दीलीपभाऊ बनकर, विश्वस्त बाळासाहेब बोराटे, बाळासाहेब आल्हाट, अरविंदभाऊ बनकर . रविंद्र आल्हाट, सचिन आल्हाट इत्यादी उपस्थित होते.
या प्रसंगी अरूणभाऊ बोऱ्हाडे यांची ” पुणे जिल्हा वीज वितरण नियंत्रण समिती” या शासकीय समितीवर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा मंदिर ट्रस्ट तर्फे सन्मान करण्यात आला.
89 Comments