Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

पुण्यातील कोंढवा परिसरात हवेत तलवारी फिरवून दहशत निर्माण करणाऱ्या टोळी विरुद्ध गुन्हा दाखल !

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ जून) : हप्तेवसुलीसाठी गुंडांच्या टोळीने हवेत तलवारी फिरवून कोंढवा परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सलग २ दिवस चालू असलेल्या या प्रकाराचा स्थानिक नागरिकांनीच प्रतिकार करून पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर ६ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला, तर एकाला अटक करण्यात आली आहे.

शाहबाज उपाख्य लंबू खान, अरबाज उपाख्य लॅब खान आणि त्यांचे ४ साथीदार यांनी मोठमोठ्याने शिवीगाळ आणि आरडाओरडा करून हैदोस घातला.धर्मांधांच्या टोळीने एका जणावर तलवारीने वार केला, तसेच रुग्णालयाची काच फोडून १० सहस्र रुपयांची हानी केली.

Google Ad

भाजी विक्रेते आणि औषधालय (मेडिकल) व्यावसायिक यांचीही मोठी हानी केली, तसेच पादचार्‍यांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले.
स्थानिक नागरिकांनी या टोळीजवळील तलवार हिसकावली आणि कोंढवा पोलिसांच्या स्वाधीन केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका आरोपीच्या कंबरेला पिस्तूल लावल्याचेही दिसून येत आहे.

दोन मासांपूर्वी या परिसरात १० जणांच्या टोळीने एकाला मारहाण केली होती. तसेच एका कार्यालयाचे ‘शटर’ आणि दुचाकी यांची हानी केली होती. दळणवळणबंदी आणि संचारबंदी यांच्या काळात कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे प्रकार सातत्याने घडत आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

6 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!