Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

चिखली येथे १३ वर्षीय मुलाची गळफास लावून आत्महत्या … कारण ऐकून पोलिसांना बसला धक्का!

महाराष्ट्र 14 न्यूज : एका क्षुल्लक कारणांवरून एका १३ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना पिंपरी चिंचवड मधील चिखली परिसरात घडली आहे. या घटेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत हा टीव्हीवर कार्यक्रम बघत होता. यावरून त्याची सावत्र आई त्याच्यावर रागावली. याच नैराश्यातून त्याने ओढणीने गळफास लावून घेतला.

घरात बेशुद्धावस्थेत आढल्यानंतर त्याच्या घरच्यांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेचा स्थानिक पोलीस आत्महत्येची नोंद केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. रमजान अब्दुल शेख, असे मृत मुलाचे नाव होते. रमजानला तासनतास टीव्ही पाहण्याची सवय होती. दरम्यान, टीव्ही पाहतो म्हणून रमजानची सावत्र आई त्याच्यावर रागावली.

Google Ad

याच नैराश्यातून रमजाने मंगळवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास रमजानने ओढणीने गळफास घेतला. घरात बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर रमजानला त्याच्या घरच्यांनी तातडीने नजीकच्या रुग्णालयात घेऊन गेले. दरम्यान, प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला पुढील उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. यामुळे रमजानच्या कुटुंबीयांवर दुख: चा डोंगर कोसळला आहे. तसेच याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी अधिक चौकशीला सुरुवात केली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

100 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!