Google Ad
Editor Choice Pune

pune : संत निरंकारी मिशन तर्फे आयोजित आपत्कालीन रक्तदान शिबीरामध्ये १२० जणांनी केले रक्तदान!

महाराष्ट्र 14 न्यूज : संत निरंकारी मिशन अंतर्गत संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनद्वारे इंदिरानगर ब्रांच द्वारे रविवार दि. २७ सप्टेंबर २०२० रोजी संत निरंकारी सत्संग भवन, गंगाधाम,पुणे येथे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ससून रुग्णालय रक्तपेढी मार्फत १२० युनिट रक्त संकलित करण्यात आले. या शिबिराचे उदघाटन सौ. स्वाती पोकळे (शहराध्यक्ष, राष्ट्रवादी महिला काँग्रेस) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या रक्तदान शिबिराला सुनील कांबळे (आमदार) यांनी आपली उपस्थिती दर्शवली.

ससून रुग्णालय रक्तपेढी, कमांड हॉस्पिटल रक्तपेढी, औंध रुग्णालय रक्तपेढी यांच्या विनंतीनुसार अशा प्रकारचे रक्तदान शिबिर पुणे जिल्ह्यात श्री. ताराचंद करमचंदानी (पुणे झोन प्रभारी) यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहेत. कोरोना व्हायरस या आजाराने महाराष्ट्रात थैमान घातल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच शासकीय यंत्रणा हैराण झाल्या असून याचा प्रभाव आरोग्य यंत्रणेवर देखील पडला आहे. ससून रुग्णालय रक्तपेढी, कमांड हॉस्पिटल रक्तपेढी, औंध रुग्णालय रक्तपेढी यांच्या आवश्यकतेनुसार रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.

Google Ad

रक्तदान शिबिरात प्रशासन-डॉक्टरांनी दिलेल्या सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्यात आले तसेच सोशल डिस्टंसिंग कडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. याच प्रकारचे रक्तदान शिबीर प्रत्येक महिन्याला पुणे जिल्ह्याच्या विविध भागामध्ये निरंकारी मिशन तर्फे आयोजित करण्यात येत आहेत अशी माहिती मंडळातर्फे देण्यात आली. रक्तदान शिबिरामध्ये उपस्थित सर्व रक्तदात्यांचे, मान्यवरांचे आभार इंदिरानगर प्रमुख अनंत दळवी यांनी केले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!