Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहरात आज आढळले १०१४ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण … तर ५१५ रुग्ण कोरोना मुक्त!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मंगळवार ( दि. ८ सप्टेंबर २०२० ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील १०१४ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून या सर्वांवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आज ५१५ रुग्ण हे कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आज मृत झालेले रुग्ण पिंपरी (स्त्री ८२ वर्षे), मोशी (स्त्री ५६ वर्षे, पुरुष ६१ वर्षे), अजमेरा (स्त्री ६१ वर्षे), काळेवाडी (पुरुष ८४ वर्षे), पिंपळे गुरव (पुरुष ६५ वर्षे, स्त्री ७३ वर्षे), अजंठानगर (स्त्री ५०), तळवडे (पुरुष ५७ वर्षे), चिखली (पुरुष २९ वर्षे), रहाटणी (स्त्री ४४ वर्षे), भोसरी (पुरुष ६६ वर्षे), निगडी (स्त्री ७२ वर्षे), बिजलीनगर (स्त्री ८३ वर्षे), दिघी (स्त्री ८० वर्षे), पिंपळेसौदागर (पुरुष ४८ वर्षे), आळंदी (पुरुष ५० वर्षे), आंबेगांव (पुरुष ६० वर्षे), मंचर (पुरुष ५१ वर्षे), सातारा (पुरुष ४७ वर्षे), बारामती (पुरुष ६७ वर्षे), दौंड (पुरुष ६५ वर्षे), खेड (स्त्री ७५ वर्षे), खंडाळा (पुरुष ७६ वर्षे) येथील रहिवासी आहेत.

Google Ad

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

81 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!