Google Ad
Editor Choice Pune

Pune : राज्य सरकारतर्फे पुण्यातील बावधन परिसरात महाराष्ट्रातील सर्वात मोठे वन्यप्राणी अनाथालय , सुश्रूषा केंद्राचे काम लवकरच!

महाराष्ट्र 14 न्यूज : राज्य सरकारतर्फे पुण्यातील बावधन परिसरात महाराष्ट्रातील सर्वात मोठे वन्यप्राणी अनाथालय व तात्पुरते सुश्रृषा केंद्र होणार असून यासाठीच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गुरूवारी या ठिकाणाला भेट देऊन तेथील कामाबाबत माहिती जाणून घेतली.

याबाबत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, कात्रज येथे असलेल्या अनाथालयात पुणे जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर विविध जातींचे पशुपक्षी उपचारासाठी दाखल होतात. त्यांची सुश्रृषा केल्यानंतर त्यांना सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याची परवानगी देण्यात येते. मात्र, उपचारानंतरही अपंगत्व प्राप्त झालेल्या पशुपक्षांना सुरक्षिततेच्या कारणास्तव अनाथालयातच ठेवावे लागते. सद्यस्थितीत अनाथालयाची जागा अपुरी पडत असल्याने वनविभागाच्या क्षेत्रामध्ये सुसज्ज यंत्रणेसह नवीन वन्यप्राणी सुश्रृषा केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Google Ad

या प्रकल्पासाठी नगरसेवक सचिन दोडके, वनपरिक्षेत्र अधिकारी दिपक पवार यांनी पाठपुरावा केला होता. खासदार सुळे यांनी या प्रकल्पासाठी सवोर्तोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी उपवनसंरक्षक राहूल पाटील, सहायक वनसंरक्षक संजय कडू, नगरसेवक सचिन दोडके, महापालिका विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खडकवासला अध्यक्ष काका चव्हाण, पुणे शहर महिलाध्यक्षा स्वाती पोकळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खडकवासला युवक अध्यक्ष कुणाल वेडे-पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रगतवार आदी उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!