Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

नवी सांगवी-पिंपळे गुरव मधील महिलांसोबत महिला नगरसेविकांनीही लुटला ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रमचा आनंद!

महाराष्ट्र 14 न्यूज : सुमारे ११ महिने पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाशी लढा देत कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी नागरसेवकांनी मोलाची भूमिका बजावली. रोजच्या आपल्या दैनंदिन कार्यक्रमात व्यस्त असलेल्या नगरसेवकांनी वेळ काढत चक्क नवी सांगवी, पिंपळे गुरव मधील महिलांच्या गुणवत्तेचा शोध घेणाऱ्या खेळ पैठणीचा या खेळाचा सुमारे तीन तास नगरसेवकांनीही इतर महिलांसोबत मनमुराद आनंद लुटला.

प्रभाग क्र. ३१ च्या वतीने निळूफुले नाट्यगृहात नगरसेविका माधवी राजापुरे, नगरसेविका सीमा चौगुले आणि नगरसेवक अंबरनाथ कांबळे यांच्या वतीने आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित “खेळ पैठणीचा २०२१” या बहारदार कार्यक्रमात नगरसेविकाही उत्साहाने सहभागी झाल्या त्यामुळे खेळला रंगत आली.

Google Ad

संगीत खुर्ची, रॅंपवॉक, नाच, उखाणे या विविध खेळांचा परिसरातील महिलांनी आनंद लुटला. येथील महिलांचा मिळालेला उस्फूर्त प्रतिसाद आणि नसगरसेवकांनी केलेल्या शानदार आयोजनाचे महापौर माई ढोरे यांनी कौतुक केले. अश्या प्रकारच्या आयोजनामुळे आपली एकीकडे संस्कृती जपली जात असतांना दुसरीकडे महिलांच्या कलागुणांना वाव मिळतो असे गौरवोद्गार महापौरांनी यावेळी काढले.

या कार्यक्रमात सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरातील महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. विभागातील महिलांना खेळा द्वारे भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच खेळ पैठणीचा आयोजित करून प्रथम क्रमांक मिळवत सौ. सुवर्णा जाधव या पैठणी च्या मानकरी ठरल्या तर मोनिका जावणे, अंजली खटावकर, दीपाली कोळी, जयश्री परदेशी या ५ विजेत्या महिलांना टी.व्ही, वॉटर कुलर, वॉशिंग मशीन, फ्रिज, मिक्सर या आकर्षक भेटवस्तू महिला नगरसेवकांच्या व महापौर माई ढोरे यांच्या हस्ते “पैठणी” प्रदान करण्यात आली. विजेत्यांना एकूण ५० बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.

 

यावेळी नगरसेवक अंबरनाथ कांबळे, नगरसेवक शशिकांत कदम, नगरसेवक सागर अंघोळकर, माजी स्थायी समिती सभापती राजेंद्र राजापूरे, रावसाहेब चौगुले, महिला बाल कल्याण समिती सभापती चंदा लोखंडे, नगरसेविका उषा मुंढे, नगरसेविका शारदा सोनवणे, नगरसेविका माधवी राजापुरे, नगरसेविका सीमा चौगुले, मारुती कवडे, भाऊसाहेब जाधव, राजू पाटील, साई कोंढरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन आर जे अक्षय यांनी केले.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

58 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!