Categories: Uncategorized

SIR म्हणजे काय? SIR यादीत (मतदार यादी) नाव आहे की नाही? पहा कसं चेक करायचं?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२९ मार्च : पुणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत सध्या राज्यभरात ‘विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. आपली लोकशाही मजबूत करण्यासाठी आणि मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या प्रक्रियेत सहभागी होणे अत्यंत आवश्यक आहे. मतदार यादी अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी ‘SIR महाराष्ट्र 2026’ चे आयोजन करण्यात आले आहे. SIR म्हणजे काय आहे? 2002 च्या मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही? यासोबत आपल्या कुटुंबातील सदस्यांचे नाव कसे अॅड करायचे? अशी आहे याची संपूर्ण माहिती ….

 SIR काय आहे? ते समजून घेऊ यात…

Special Intensive Revision म्हणजेच SIR.. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, मतदार यादी दुरुस्ती करणे. पण याची प्रक्रिया जरा वेगळी असते. SIR मध्ये प्रत्येक घरात जाऊन विचारपूस करून डिप्लिकेट मतदार वगळण्यात  येतात आणि नवीन मतदार यादीमध्ये अॅड केले जाते.

अनेक लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी राहायला जातात किंवा काही वेळा मतदार यादीत चुकीची नावे तशीच राहतात. हीच दुरुस्ती करण्यासाठी SIR दरम्यान बीएलओ (BLO – बूथ लेव्हल ऑफिसर) घरोघरी जाऊन मतदारांच्या माहितीची खातरजमा करतात.

या प्रक्रियेसाठी नागरिकांकडून जन्मतारीख, पालकांची माहिती तसेच आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यांसारखी कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार आहेत. चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास नाव वगळले जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या प्रक्रियेत नक्की काय होते?

बीएलओ स्वतः घरी येऊन तुम्ही तिथेच राहता की नाही, याची खात्री करतात.

काही बदल करायचा असल्यास आवश्यक फॉर्म भरून घेतात.

मृत व्यक्तींची किंवा स्थलांतरित झालेल्यांची नावे यादीतून वगळली जातात.

18 वर्षे पूर्ण झालेल्या नवीन तरुणांची नावे मतदार यादीत समाविष्ट केली जातात.

2002 च्या SIR लिस्टमध्ये नाव आहे की नाही? कसं चेक करायचं?

यासाठी तुम्हाला निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जायचं आहे, किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा अॅप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे.

त्यानंतर लॉगिन करून घ्यायचं आहे.

त्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन मिळतील.

01. Search your name in SIR यावर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचं राज्य, जिल्हा, मतदारसंघ टाकून तुमचं नाव या यादीत आहे की नाही ते चेक करायचं आहे.

02. आणि दुसरं ऑप्शन आहे Last SIR E-Roll यावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचं राज्य, जिल्हा, मतदारसंघ, गाव किंवा मतदान केंद्र टाकल्यानंतर तुम्हाला VIEW यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर लिस्ट आली असेल. त्यात तुमचं नाव आहे की नाही ते चेक करा. जर नसेल तर तुम्हाला SIR यादीत नाव अॅड करावं लागेल.

त्यासाठी तुम्हाला तुमचं मतदारकार्ड, आधारकार्ड आणि तुमच्या पालकांचं नाव 2002 च्या SIR यादीत असणं बंधनकारक आहे.

बीएलओ (BLO) पडताळणीसाठी तुमच्या घरी आले आणि त्यांना असे आढळले की तुम्ही त्या पत्त्यावर आता राहत नाही (स्थलांतरित झाले आहात) किंवा त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तरच नाव काढण्याची प्रक्रिया सुरू केली जाते.

 आपल्या मताधिकाराचे संरक्षण करा! ️

पुणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत सध्या राज्यभरात ‘विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. आपली लोकशाही मजबूत करण्यासाठी आणि मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या प्रक्रियेत सहभागी होणे अत्यंत आवश्यक आहे.

काय आहे ‘SIR’ प्रक्रिया?
भविष्यात मतदार यादीबाबत कोणतेही आक्षेप येऊ नयेत आणि आपली नोंदणी अधिकृत व अचूक राहावी यासाठी तुमची सध्याची माहिती सन २००२ च्या मतदार यादीशी प्रमाणित (Match) केली जाणार आहे.

✅ तुम्हाला काय करायचे आहे?
१. निवडणूक आयोगाच्या  http://voters.eci.gov.in  या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
२. तिथे ‘Search your name in LAST SIR’ हा पर्याय निवडून आपले नाव तपासा.
३. नाव मिळाल्यास तुमचा मतदार संघ क्रमांक, भाग क्रमांक आणि अनुक्रमांक नोंदवून ठेवा.
४. ही माहिती तुमच्या भागातील BLO (मतदार केंद्रस्तरीय अधिकारी) यांच्याकडे सुपूर्द करा.

⚠️ लक्षात ठेवा:
जर तुमचे नाव २००२ च्या यादीत सापडत नसेल, तर घाबरून न जाता आपल्या आई-वडिलांची किंवा आजी-आजोबांची २००२ ची माहिती BLO कडे जमा करावी.

टिप: ही प्रक्रिया सर्वांसाठी बंधनकारक आहे. आपल्या भागातील BLO लवकरच तुमच्याशी संपर्क साधतील, तरी त्यांना योग्य माहिती देऊन सहकार्य करावे ही विनंती.

चला, एक जागरूक नागरिक म्हणून प्रशासनाला सहकार्य करूया!

Maharashtra14 News

Recent Posts

धरणातील पाणीसाठा 16 टक्क्यांवर … जून संपला; पावसाने मारली दांडी, पिंपरी चिंचवडकरांचा पाणी प्रश्न अधिक गंभीर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.01 जुलै : सध्या पवना धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर घसरला आहे, ज्यामुळे…

2 weeks ago

सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल उद्योजक ‘सखाराम रेडेकर’ यांना प्रतिष्ठित ‘शाहू महाराज पुरस्कार २०२६’ प्रदान

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ उत्साहात संपन्न... महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी,…

3 weeks ago

पाणीपुरवठा विभागाकडून प्रभाग 31 आणि 29 नवी सांगवी- पिंपळे गुरव मधील पाणीपुरवठा वेळेत असा होणार बदल …

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.25 जून : पिंपरी-चिंचवड शहरात सध्या पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे.…

3 weeks ago

पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्याच्या पाटबंधारे विभागाकडून पिंपरी चिंचवड महापालिकेला सूचना; कपात आजपासून सुरू

*सध्या पवना धरणामध्ये केवळ १९ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध* *पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्याच्या…

4 weeks ago

कचरा नियमांची सक्ती आणि सोसायट्यांवरील दंडात्मक कारवाई तुर्तास रोखा! – आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १८ जून (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांवर (Bulk Waste…

1 month ago

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक! किसनराव दगडोबा मोहोळ यांचे दुःखद निधन

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.18 जून : केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पुण्याचे माजी…

1 month ago