Categories: Health & Fitness

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक जगताप

आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, २२ सप्टेंबर (प्रतिनिधी) २०२६ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना डॉक्टरांनी लिहून दिलेली आवश्यक औषधे रुग्णालयाच्या औषध वितरण केंद्रात उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. औषधांची ही कमतरता तातडीने दूर करून रुग्णांना सर्व आवश्यक औषधे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी भाजपचे नगरसेवक ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली जगताप यांनी केली आहे.

याबाबत जगताप यांनी मंगळवारी (दि. २२) महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, वायसीएमचे अधिष्ठाता राजेंद्र वाबळे यांना निवेदन दिले. वायसीएम रुग्णालयात शहरासह आसपासच्या परिसरातील हजारो सर्वसामान्य, गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्ण उपचारांसाठी येतात. मात्र, डॉक्टरांनी लिहून दिलेली अनेक औषधे वितरण केंद्रात मिळत नसल्याने रुग्णांना खासगी औषध विक्रेत्यांकडून महागड्या दराने ती खरेदी करावी लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांच्या उपचारांमध्ये खंड पडून आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. औषधांच्या कमतरतेमुळे कोणत्याही रुग्णाचा उपचार थांबू नये किंवा रुग्णाच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत. महापालिकेकडून आरोग्यसेवेसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली जात असतानाही रुग्णालयात अत्यावश्यक औषधे उपलब्ध नसणे चिंताजनक आहे. डॉक्टरांनी औषध सूचीतील औषधे लिहून दिल्यानंतरही ती वितरण केंद्रात मिळत नसतील, तर औषधांची खरेदी, साठवणूक आणि वितरण प्रक्रियेची तातडीने चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे जगताप यांनी नमूद केले.
——————————-

औषधसाठ्याची तातडीने तपासणी करा

वायसीएम रुग्णालयातील उपलब्ध आणि अनुपलब्ध औषधांच्या साठ्याची तातडीने तपासणी करावी. दैनंदिन उपचारांसाठी आवश्यक असलेल्या सर्व औषधांची आपत्कालीन पद्धतीने खरेदी करून ती रुग्णांना रुग्णालयातूनच विनामूल्य द्यावीत. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, बालरोग आणि अन्य गंभीर आजारांवरील औषधांचा पुरेसा साठा कायम ठेवावा, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. औषध वितरण केंद्राबाहेर उपलब्ध आणि अनुपलब्ध औषधांची अद्ययावत यादी दररोज प्रसिद्ध करावी. औषधांच्या कमतरतेस जबाबदार असलेले अधिकारी, पुरवठादार अथवा कंत्राटदार यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. रुग्णांना बाहेरून औषधे विकत घेण्यास सांगितले जात असल्यास संबंधित विभागाकडून लेखी स्पष्टीकरण घ्यावे, असेही जगताप यांनी म्हटले आहे.

———————————

स्वतंत्र तक्रार निवारण कक्षाची मागणी

औषधांबाबत रुग्णांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी रुग्णालयात स्वतंत्र मदत व तक्रार निवारण कक्ष सुरू करावा. औषध खरेदी आणि वितरण व्यवस्थेवर नियमित देखरेख ठेवण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. या प्रकरणात केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल सात दिवसांच्या आत देण्यात यावा, अशी मागणी जगताप यांनी केली आहे. प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल न घेतल्यास रुग्ण आणि नागरिकांच्या हितासाठी संबंधित वरिष्ठ विभाग व राज्य शासनाकडे तक्रार करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
—————————–

Maharashtra14 News

Recent Posts

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

2 weeks ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

2 weeks ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

4 weeks ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

1 month ago

“खड्डा दिसला तर फोटो काढा, ठिकाण नोंदवा” … पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आतापर्यंत २,२४७ पैकी १,७३३ खड्डे बुजविले; उर्वरित खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

  महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १७ ऑगस्ट २०२६ :* पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाच्या अहवालानुसार,…

1 month ago