Categories: Uncategorized

राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर पिंपरी-चिंचवडला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत! … प्रशांत शितोळे

महाराष्ट्र 14 न्यूज, दि २९ मार्च : पिंपरी-चिंचवड शहराला खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ आणि सोयीसुविधांनी युक्त करण्यासाठी आज पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे ‘पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लि.’ (PCSCL) ची महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवीन महापालिका भवन चिंचवड येथील सायन्स पार्क व डी मार्टशेजारी तयार होत आहे. येत्या पाच सहा महिन्यांत त्या इमारतींचे काम पूर्ण होणार आहे. तसेच उर्वरित कामे व फर्निचरचे काम झाल्यानंतर म्हणजे पुढील वर्षी त्या नव्या कोऱ्या इमारतींमधून स्मार्ट कारभार सुरू करता येणार आहे. मागील चार वर्षे प्रशासकीय कार्यकाळ होता,  त्यामुळे आता नवीन कारभारांना नागरिकांच्या करिता त्याविषयी अनेक संकल्पना आहेत, त्यांना मूर्त स्वरूप देण्याकरिता त्यापूर्ण करण्याकरिता व त्यावर उपाययोजना करण्यासाठी नवनिर्वाचित करभाऱ्याकडून बैठका आयोजित करण्यात येत आहेत, …

अशीच एक बैठक विभागीय आयुक्त कार्यालय येथे पार पडली या बैठकीत प्रामुख्याने शहरातील प्रलंबित प्रकल्प, सीसीटीव्ही सर्वेक्षण, स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट आणि नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करणाऱ्या तंत्रज्ञानावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी प्रशांत शितोळे (सत्तारूढ पक्षनेते, पिंपरी चिंचवड मनपा), चंद्रकांत पुलकुंडवार (विभागीय आयुक्त, पुणे विभाग) डॉ. विजय सूर्यवंशी (आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका), अभिषेक बारणे (सभापती, स्थायी समिती), भाऊसाहेब भोईर (विरोधी पक्षनेते) व स्मार्ट सिटीचे सर्व वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

प्रशासकीय समन्वय आणि राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर पिंपरी-चिंचवडला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत! शहरे बदलतील, तेव्हाच देश बदलेल!

प्रशांत शितोळे

सत्तारूढ पक्षनेता, पिंपरी चिंचवड मनपा

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

2 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

4 weeks ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

4 weeks ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

1 month ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

2 months ago