महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, 18 नोव्हेंबर : महिलांना स्त्रीरोग तज्ज्ञांकडून तपासणी, सल्ला आणि उपचार मोफत मिळावेत, यासाठी १९ आणि २० नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हा रुग्णालय येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दोन्ही दिवशी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत महिलांना शिबिराचा लाभ घेता येईल.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकारातून चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट, प्रतिभा महिला प्रतिष्ठान आणि जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
……..
स्त्रीरोग तपासणीपासून कर्करोग तपासणीपर्यंत सुविधा
मासिक पाळीतील अनियमितता किंवा अतिरक्तस्राव, पोटदुखी, गर्भधारणेशी संबंधित अडचणी, वंध्यत्व, रजोनिवृत्तीनंतरचे त्रास, कंबरदुखी, मूत्राशयाच्या तक्रारी, स्तनांतील गाठी तसेच गर्भाशय व अंडाशयातील गाठी यांसाठी शिबिरात तज्ज्ञांकडून तपासणी व सल्ला दिला जाणार आहे.शिबिरात रक्त तपासणी, पोट व स्तनांची सोनोग्राफी, स्तनांची तपासणी आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी पॅप स्मिअरची सुविधा असेल. आवश्यकतेनुसार सीटी स्कॅन व एमआरआय तपासणीचीही सुविधा उपलब्ध असेल, असे आयोजकांनी सांगितले. याशिवाय आहार, जीवनशैली, मानसिक आरोग्य आणि रजोनिवृत्तीविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.
………
पात्र महिलांसाठी शस्त्रक्रिया मोफत
शस्त्रक्रियेची गरज असलेल्या पात्र महिलांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत ओपन व लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील, अशी माहिती डॉ. देविदास शेलार यांनी दिली.शिबिराला येताना आधार कार्ड, आयुष्मान भारत कार्ड आणि रेशन कार्ड सोबत आणावे. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
……..
राजकारणापलीकडची सामाजिक बांधिलकी जपत आमदार शंकर जगताप यांचा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात! ३० टन जीवनावश्यक…
पाणी बचतीसाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी दक्षता घ्यावी, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे विभागांना निर्देश... पाणी…
वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…
ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…
जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. ८ सप्टेंबर २०२६ : पिंपरी चिंचवड हे आशिया खंडात आणि…