Categories: Uncategorized

सर्वसामान्यांना महागाईत मोठा दिलासा …! १ एप्रिलपासून वीज दरात कपात, प्रति युनिटमागे किती रुपये द्यावे लागणार?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ मार्च : सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील वीज ग्राहकांसाठी नवीन आर्थिक वर्ष दिलासादायक ठरणार आहे.राज्यभरातील वीज दरांमध्ये कपात करण्यात आली आहे. १ एप्रिलपासून नवीन दर लागू होणार आहेत. महावितरण, बेस्ट, अदानी आणि टाटा पॉवर या कंपन्यांनी घरगुती वीज दरांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः बेस्ट प्रशासनाने कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त दरात वीज देण्याचा निर्णय घेतलाय.

महावितरण, अदानी, बेस्ट आणि टाटा या वीज वितरण कंपन्यांनीच नवीन वीजदर लागू करण्याबाबत एक प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे पाठवला होता. या प्रस्तावाला राज्य वीज नियामक आयोगाने मंजुरी दिली. या मंजुरीनंतर वीज दरात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे महागाईमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

१ एप्रिलपासून वीज बिल किती आकारले जाणार?

२०२६-२७ या आर्थिक वर्षात ० ते १०० युनीटसाठी ४.३ रुपये द्यावे लागणार आहेत. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी याच युनीटसाठी ४.७६ रुपये द्यावे लागत होते. म्हणजेच वीज दरात ९.७ टक्के कपात करण्यात आली आहे.

२०२६-२७ या आर्थिक वर्षात १०१ ते ३०० युनीटसाठी ७.१ रुपये द्यावे लागणार आहेत. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी याच युनीटसाठी ७.९६ रुपये द्यावे लागत होते. म्हणजेच वीज दरात १०.८ टक्के कपात केली आहे.

२०२६-२७ या आर्थिक वर्षात ३०१ ते ५०० युनीटसाठी ११.६४ रुपये द्यावे लागणार आहेत. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी याच युनीटसाठी १३.५५ रुपये द्यावे लागत होते. म्हणजेच वीज दरात १४ टक्के कपात करण्यात आली आहे.

तर, २०२६-२७ या आर्थिक वर्षात ५०० पेक्षा युनीटसाठी १२.६४ रुपये द्यावे लागणार आहेत. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी याच युनीटसाठी १४.५५ रुपये द्यावे लागत होते. म्हणजेच वीज दरात १३.१ टक्के कपात करण्यात आली आहे.

 

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

2 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

4 weeks ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

4 weeks ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

1 month ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

2 months ago