Categories: Uncategorized

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई!

व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.09 सप्टेंबर : पिंपरी-चिंचवड : एक्स्प्रेस वेवर आलिशान फॉर्च्युनर गाडीच्या मागील नंबर प्लेटची उघडझाप करत धावणाऱ्या वाहनाचा रील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. YouTube, Facebook, Instagramसह विविध इलेक्ट्रॉनिक मीडिया प्लॅटफॉर्मवर या रीलने चांगलाच धुमाकूळ घातला होता.

या व्हायरल व्हिडिओची गंभीर दखल घेत पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेअंतर्गत वाकड वाहतूक विभागात कार्यरत पोलीस हवालदार रोहिदास धोंडू बोऱ्हाडे यांनी संबंधित वाहनाचा शोध सुरू केला.

सतर्क पोलिसांच्या तपासाला यश!

व्हायरल रीलच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत संबंधित फॉर्च्युनर वाहनाचा व मालकाचा शोध घेण्यात आला. त्यानंतर संबंधित वाहनमालकाविरुद्ध BNS तसेच मोटार वाहन कायद्यातील विविध कलमांनुसार वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर रील करून कायद्याला आव्हान देणाऱ्यांना वाकड वाहतूक पोलिसांचा दणका!

व्हायरल रीलवर नजर, वाहनाचा शोध आणि थेट कायदेशीर कारवाई — पोलीस हवालदार रोहिदास बोऱ्हाडे यांच्या सतर्कतेमुळे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना चांगलाच धडा!

वाकड वाहतूक पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

1 week ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

3 weeks ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

1 month ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

1 month ago

“खड्डा दिसला तर फोटो काढा, ठिकाण नोंदवा” … पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आतापर्यंत २,२४७ पैकी १,७३३ खड्डे बुजविले; उर्वरित खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

  महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १७ ऑगस्ट २०२६ :* पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाच्या अहवालानुसार,…

2 months ago