Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

🔴पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे काय आहे, मिशन प्रतिदिन २५ हजार … आता दररोज सकाळी ८ ते रात्री ८ कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .०४ एप्रिल २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात मिशन २५ हजार कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम राबविण्यात येत असून सुपर स्प्रेडर्स सह वय वर्षे ४५ व त्यावरील नागरिकांनी उद्या दि .५ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत कोविड लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे .

मिशन २५ हजार कोविड लसीकरण उद्दीष्ट साध्य करण्यासाठी आयुक्त पाटील यांनी महापालिकेच्या फेसबुक वरुन नागरिकांशी थेट संवाद साधला . पुणे जिल्हयात १ लाख कोविड लसीकरण करण्याचे उद्दिष्ट शासनाने समोर ठेवले आहे . त्यातील २५ हजार लसीकरणाच्या उद्दीष्टपुर्ती साठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे असे नमुद करुन आयुक्त पाटील म्हणाले , जगभरात कोविड लसीकरणामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढल्याचे दिसून आले आहे . कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरु आहेत . आरोग्याच्या सुरक्षितेसाठी कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीकरण महत्वाचे ठरले आहे .

Google Ad

भारत सरकारने सुरु केलेल्या लसीकरण मोहिमेध्ये आपण सहभागी आहोत . प्रतिदिन २५ हजार नागरिकांचे लसीकरण करता येऊ शकेल एवढी लसीकरण केंद्रे महानगरपालिकेने सुरु केलेली आहेत . अत्यावश्यक सेवेतील अधिक व्यक्तींशी विविध कामानिमित्त संपर्कात येणा – या सुपर स्प्रेडर्संना प्राधान्याने लसीकरण मोहिमेअंतर्गत कोविड १९ लस देण्याचे प्रयोजन आहे . यामध्ये दुकानदार , भाजी विक्रेते , वाहनचालक , एस . टी . आणि पी.एम.पी.एम.एल. मध्ये काम करणारे कर्मचारी , सुरक्षा रक्षक , शिक्षक , आरोग्य सेवा देणा – या व्यक्ती आदींचा समावेश आहे . या सर्वांनी नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन आयुक्त पाटील यांनी केले .

🔴 नवी सांगवी फेमस चौक येथे 1 BHK फ्लॅट भाड्याने देणे आहे.
संपर्क : – 8️⃣9️⃣9️⃣9️⃣2️⃣8️⃣4️⃣8️⃣9️⃣5️⃣

झोपडपट्टी परिसरातील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी देखील महानगरपालिकेने व्यवस्था आहे . लसीकरण केंद्र दूर असल्यास नागरिकांना त्या केंद्रापर्यंत ने – आण करण बसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे . लोकप्रतिनिधी , विविध सेवाभावी संघटना , सामाजिक व राजकिय कार्यकर्त्यांनी या मोहिमेध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन आपल्या घरातील आणि परिसरात असणा – या ४५ वर्ष वयावरील तसेच लसीकरणासाठी पात्र असणा – या व्यक्तींना लसीकरणासाठी प्रोत्साहीत करुन त्यांचे लसीकरण करुन घ्यावे . तसेच त्यांना आवश्यक सहकार्य देखील करावे असे आयुक्त पाटील म्हणाले .

शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने वैद्यकीय यंत्रणेवर परिणाम होणे साहजिक आहे . त्यामुळे प्रत्येकाने कोरोना विषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करुन स्वत : च्या आरोग्याची काळजी घ्यावी . होम आयसोलेशन मध्ये असणारे काही कोरोना बाधित रुग्ण नियमांचे पालन करत नसल्याचे निदर्शनास येत असून असे रुग्ण अत्यवस्थ होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे . त्यामुळे या रुग्णांनी नियमांचे काटेकोर पालन करावे . होम आयसोलेशन मध्ये असणा – या कोरोना बाधिताने नियमांचे पालन न केल्यास अशा व्यक्तींची माहिती तात्काळ महापालिकेला देण्यात यावी .

🔴 नवी सांगवी फेमस चौक येथे 1 BHK फ्लॅट भाड्याने देणे आहे.
संपर्क : – 8️⃣9️⃣9️⃣9️⃣2️⃣8️⃣4️⃣8️⃣9️⃣5️⃣

नियमांचे उल्लंघन करणा – या अशा व्यक्तींवर निश्चितपणे कारवाई केली जाईल असे आयुक्त पाटील यांनी स्पष्ट केले . कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाने योग्य पध्दतीने मास्कचा वापर , फिजीकल डिस्टसिंग चे पालन , आणि सॅनिटायझेशन या नियमांचे प्रत्येकाने पालन करणे आवश्यक आहे . कोरोनाची लक्षणे जाणवल्यास वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घेऊन त्यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे . कोविड १ ९ प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी प्रत्येकाने सहभाग आणि सहकार्य करुन मोहिम यशस्वी करावी असे आवाहन आयुक्त पाटील यांनी केले .

दरम्यान , विविध सेवाभावी संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत आज महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये बैठक घेण्यात आली . अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे , महिला वैद्यकीय अधिकारी डॉ.वर्षा डांगे यांनी या प्रतिनिधींशी संवाद साधून कोविड लसीकरण मोहिम यशस्वीतेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!