Google Ad
Editor Choice india

काय आहे?… मोदी सरकारचे ऐतिहासिक कामगार बील

महाराष्ट्र 14 न्यूज : मोदी सरकारचे ऐतिहासिक कामगार बिल :-

🔴 कॉन्ट्रैक्ट कर्मचायांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणेच सेवा अटी , रजा आणि सामाजिक सुरक्षा !
🔴स्वयंरोजगाराशी संबंधित लोकांची किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षा याची खात्री !

Google Ad

🔴वर्षातून एकदा मालकाद्वारे त्याच्या कर्मचाऱ्यांना मोफत आरोग्य तपासणी सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल .

🔴 स्थलांतरित कामगारांना आता त्यांच्या गावी जाण्यासाठी प्रवास भत्ता देण्यात येईल .

🔴 सर्व कामगारांना ईएसआयसी आणि ईपीएफओद्वारे सामाजिक सुरक्षा कवच अनिवार्य करण्यात येईल

🔴40 कोटी असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा निधी . – महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण प्रदान करणे ही मालकाची जबाबदारी .

🔴प्रवासी कामगारांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन असेल , रँडम वेब आधारित तपासणी यंत्रणा सुरु केली जाईल , निरीक्षकांना ‘ इन्स्पेक्टर कम फॅसिलिटेटर ‘ केले जाईल .

🔴स्थलांतरित कामगारांच्या आकडेवारीच्या आधारे योजनांचे अधिक चांगले लक्ष्यीकरण केले जाईल .

🔴कामगारांना जास्तीत जास्त लाभ देण्यास हा कायदा मदत करेल , अशा व्यापकतेमुळे देशांतर्गत गुंतवणूक , एफडीआय वाढेल , व मोठया प्रमाणात रोजगार वाढेल .

🔴’ व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य कोड ‘ आयटी आणि सेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही कव्हर करेल .
🔴 सिने कामगारांच्या परिभाषेत ऑडिओ – व्हिज्युअल कामगारांचा समावेश असेल .

🔴 कामगारांवर अन्याय होत असल्यास हा कायदा कामगारांना त्वरित न्याय मिळवून देण्यास सक्षम . खटले निकाली काढण्यासाठी व्हायब्रट यंत्रणेची व्यवस्था असेल . एक नोंदणी एक परवाना .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!