Google Ad
Editor Choice Maharashtra

Nashik : नाशिकमध्ये शनिवार , रविवार लॉकडाऊन … 15 मार्चपर्यंतच लग्न समारंभांना परवानगी!

महाराष्ट्र 14 न्यूज : नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने बुधवारी, 10 मार्चपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दर शनिवारी, रविवारी सर्व दुकाने, धार्मिक स्थळे बंद राहतील. उर्वरित पाच दिवस सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेतच ती सुरू असतील, असे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत. हा लॉकडाऊन नसून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केवळ गर्दी होणाऱया जागांवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने लक्ष केंद्रित केले आहे, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.

Google Ad

🔴15 मार्चपर्यंतच लग्न समारंभांना परवानगी

पूर्वनियोजित असलेले 15 मार्चपर्यंतचेच लग्न समारंभ स्थानिक स्वराज्य संस्था, संबंधित पोलिसांची परवानगी घेऊन केवळ सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेतच होतील. 15 मार्चनंतर लॉन्स, मंगल कार्यालये व इतर ठिकाणी असे कार्यक्रम घेण्यास पुढील आदेशापर्यंत बंदी करण्यात आली आहे.

Tags
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!