Google Ad
Editor Choice Education

Varanashi : शिकतानाच कमवतोय 22 कोटी … आयआयटीच्या विद्यार्थ्यांसाठी वाराणसीच्या सौरभने सुरू केले क्रॅश कोर्स!

महाराष्ट्र 14 न्यूज : वाराणसीचा 22 वर्षीय सौरभ मौर्य सध्या देशातील तरुणांचा आदर्श झाला आहे. सौरभ आयआयटी बीएचयूमध्ये तिसऱया वर्षांत शिक्षण घेत आहे. स्वतः शिकतानाच तो अन्य विद्यार्थ्यांना क्रॅश कोर्सद्वारे मार्गदर्शन करत आहे. त्यासाठी त्याने तीन स्टार्टअप कंपन्या सुरू केल्या आहेत. या पंपन्यांचे वार्षिक उत्पन्न तब्बल 22 कोटी रुपये आहे.

सामान्य कुटुंबातील सौरभने मोठय़ा कष्टाने शिक्षण घेऊन इथपर्यंतचा पल्ला गाठला आहे. आयआयटी उत्तीर्ण झाल्यानंतर चांगल्या पगाराची नोकरी न करता त्याने स्वतःचं असं काहीतरी करायचं ठरवलं. 2018 साली पहिल्या वर्षाला असताना त्याच्या आईने त्याला पाच हजार रुपये दिले होते. त्यातून त्याने सेकंड हँड मोबाईल खरेदी केला. तिथूनच सौरभच्या करियरची सुरुवात झाली. त्याने यूटय़ूब चॅनेल सुरू केले. यात तो आयआयटी संदर्भातील काही महत्वाच्या टीप्स आणि धडे विद्यार्थ्यांना देऊ लागला.

Google Ad

व्हाईट बोर्डवर टीप्स लिहून त्याचे व्हिडिओ शूट करून अपलोड करू लागला. व्हिडियोवर येणाऱया चांगल्या कमेंट बघून सौरभचा उत्साह वाढला. त्याने पहिला स्टार्टअप सुरू केला. आयआयटीची तयारी करणाऱया इयत्ता 11वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांना त्याने मार्गदर्शन करायला सुरुवात केली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासोबतच त्यांच्यासाठी काही खास कोर्स तयार करावा, असे सौरभला वाटले.

सौरभने दोन हजार रुपयांत क्रॅश कोर्स संकल्पना सुरू केली. 2019 साली एसएसडी एडटेक लिमिटेड नावाची कंपनी त्यानं सुरू केली. केवळ 1500 रुपयांत सुरू केलेला स्टार्ट अप एकाच वर्षात 11 कोटी रुपयांच्या उलाढालीपर्यंत पोहोचला. यासोबतच सैरभने विद्यार्थ्यांना हॉस्टेल व्यवस्था पिंवा शिक्षणासाठी कर्ज यांसारख्या सुविधा देण्यासाठी रँकर्स कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड पंपनी सुरू केली. आजच्या घडीला सौरभच्या पंपनीच्या वाराणसीमध्ये तीन शाखा आहेत. तर एक शाखा गाझियाबादमध्येही आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी 200 हून अधिक आयआयटी मेंबर्स आणि 13 शिक्षक आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!