Google Ad
Maharashtra crimes

अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने वार करून … राहाटणीत सराईत गुन्हेगाराचा भरदिवसा खून 

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७जून) : पिंपरी चिंचवड शहरातील राहाटणीत अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने वार करून सराईत गुन्हेगाराचा भरदिवसा खून केला. ही घटना रविवारी (दि. २७) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. निशांत सुरवसे (वय २२ रा. सज्जनगड, राहटणी) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, निशांत सुरवसे हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. दरम्यान, रविवारी निशांत मित्रांसोबत रहाटणी येथील त्याच्या बहिणीकडे गेला होता. त्यावेळी कारमध्ये आलेल्या आरोपींनी त्याच्यावर हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे निशांतच्या मित्रांनी त्याला सोडून पळ काढला.

Google Ad

त्यानंतर आरोपींनी निशांतच्या डोक्यावर कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. वाकड पोलिसांनी रात्री उशिरा काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. दोन गटाच्या वर्चस्ववादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. पुढील तपास वाकड पोलिस करत आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

47 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!