Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

काळविटाची शिंगे विकण्यासाठी आलेल्या ०२ आरोपींना अटक त्यांचे कडुन ५,००,००० / – रु . किं ची ०५ जोडी काळविटाची शिंगे जप्त

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .०२ जुलै २०२१) : ०२जुलै रोजी गुन्हे शाखा युनिट -४ , चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक , प्रसाद गोकुळे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख , सहायक पोलीस उपनिरीक्षक , नारायण जाधव , पोहवा / ४७० असवले , पोना / ११४२ आढारी , पोशि / १८७२ चव्हाण , पोशि / २१०२ सैद असे वाकड पोलीस ठाणे हद्दित वाढती वाहन चोरी व घरफोडी चोरी गुन्हयाचे अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना गुन्हे शाखा युनिट -४ कडील पोना / ११४२ लक्ष्मण आढारी यांना त्यांचे बातमीदारा मार्फत मिळाली.

माहिती नुसार चाकण शिक्रापुर रोड वरिल वडगाव घेनंद फाटा येथे काळविटाची शिंगे विक्री करिता आलेले आरोपी सचिन गजानन राठोड , वय -२२ वर्षे रा – मु.पो . गणेशपुर ता . दारव्हा जि . यवतमाळ व सागर रामराव मात्रे , वय -२३ वर्षे रा- डॉ . प – हाड यांचे घरी , स्टेट बँक जवळ , पाबळ चौक , शिक्रापुर पुणे मुळ रा . साजेगाव ता . दारव्हा जि . यवतमाळ यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन भारतीय वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा १ ९ ७२ चे परिशिष्ट ०१ मध्ये सामिल असलेल्या काळविट या प्राण्याचे ५,००,००० / – रु . किं ची ०५ जोडी काळविटाची शिंगे जप्त करण्यात आली असुन त्यांचे विरुद्ध चाकण पोलीस ठाणे , गु.र.नंबर | ७८१/२०२१ वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा १ ९ ७२ चे कलम ० ९ , ३ ९ , ४३,४८ ( अ ) , ४ ९ , ५१ गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Google Ad

तसेच त्यांचे कडे मिळुन आलेल्या काळविटाचे शिंगांबाबत केलेल्या तपासात त्यांनी त्यांचे मुळ गावाकडे शेताला लावलेल्या इलेक्ट्रीक तारेचे कंपाउंड ला करंट लागुन मरण पावलेल्या काळविटांची सदर शिंगे असल्याचे सांगितली आहे . तसेच पुढील तपास चाकण पोलीस ठाणे हे करत आहे .

सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त मा . श्री . कृष्ण प्रकाश साो , अपर पोलीस आयुक्त मा . श्री . रामनाथ पोकळे साो , पोलीस उप – आयुक्त , गुन्हे मा . सुधीर हिरेमठ साो , सहा . पोलीस आयुक्त , गुन्हे मा . श्री . प्रशांत अमृतकर सो यांचे मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा , युनिट -४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे , सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख , सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश बाबर , सहा.पो.उप.नि. धर्मराज आवटे ,

दादाभाऊ पवार , नारायण जाधव , पोहवा / प्रविण दळे , संजय गवारे , अदिनाथ मिसाळ , राहिदास आडे , तुषार शेटे , संतोष असवले , पोना / लक्ष्मण आढारी , मो . गौस नदाफ , वासुदेव मुंडे , पोशि / प्रशांत सैद , सुनिल गुट्टे , तुषार काळे , सुरेश जायभाये , धनाजी शिंदे , सुखदेव गावंडे , गोंविद चव्हाण , यांनी केली आहे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!