Google Ad
Editor Choice Pune District

Maval : धबधबा पाहायला गेले, अन पाण्यात बुडून वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू … मावळ तालुक्यातील घटना

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५जुलै) : मावळ तालुक्यातील कुसगाव येथील धबधब्याच्या पाण्यात बुडून वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू झालाय. मृत वडीलांचं नाव पिराजी सुळे आणि मुलांची नावं सचिन सुळे आणि साईनाथ सुळे अशी आहेत. रविवारची सुट्टी असल्याने पिराजी सुळे हे आपल्या दोन्ही मुलांना घेऊन कुसगाव खुर्द येथील धबधबे पाहिला गेले. त्यावेळी कुसगाव खुर्द या ठिकाणी असलेल्या दगड खाणीच्या खड्डयाचा अंदाज न आल्याने हे तिघेही पाण्यात बुडून मृत्यू झाला असा, असा प्राथमिक अंदाज कामशेत पोलिसांनी वर्तवला आहे.

कुसगाव खुर्द येथील धबधब्याजवळ बुडून मृत्यू झालेल्या तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. सुळे कुटुंबीय 12 वर्षांपूर्वी नांदेडहून मावळ तालुक्यातील कामशेत भागात उदरनिर्वाहासाठी आले होते. सध्या हे कुटुंब राहायला पण कामशेत भागात आहेत. आज (25 जुलै) रविवार असल्यामुळे कामशेत जवळ असलेल्या कुसगावचा धबधबा पाहायला गेले. त्या धबधब्याजवळ दगड खाण आहे. त्या दगडखाणीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं पाणी साचलं. या दगडखाणीमधील पाण्यामध्ये हे तिघे बुडाले.

Google Ad

मृतांची नावं? पिराजी सुळे (वडील, वय 40), सचिन सुळे (लहान मुलगा, 11), साईनाथ सुळे (मोठा मुलगा, 14)

Google Ad

About the author

Maharashtra14 News

16 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!