Google Ad
Editor Choice

पिंपळे गुरवमधील सामाजिक कार्यकर्ते ‘सुभाष दामोदर जगताप-पाटील’ यांचे दुःखद निधन!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरवमधील सामाजिक कार्यकर्ते कै. सुभाष दामोदर जगताप यांचे आज रविवार दि. २८ मार्च रोजी दुपारी १२.३० वा. अल्पशा आजाराने खाजगी रुग्णालयात वयाच्या ५२ व्या वर्षी दुःखद निधन झाले. मूळचे पिंपळे गुरव चे असलेले सुभाष जगताप त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, एक भाऊ – वहिनी पुतणे असा मोठा परिवार आहे.

पिंपळे गुरव गावातील विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यात ‘सुभाष जगताप’ त्यांचा सदैव मोलाचा वाटा असायचा, त्यांना शेती आणि गाई-बैल यांची विशेष आवड होती. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत त्यांनी सेवा केली होती. कार्यमग्न आणि मदतीला धावून येणारा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांची गावात ओळख होती. नवी सांगवी पिंपळे गुरव मधील त्यांच्या चाहत्यांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली तसेच हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना मिळो , ही प्रार्थना!

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!