Google Ad
Editor Choice Technology

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात ७ एकर जागेवर उभारणार … जागतिक दर्जाची, भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी !

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१सप्टेंबर) : पुणे शहरात विज्ञानाशी संबधित राष्ट्रीय स्तरावरील अनेक संस्था आहेत. त्यामुळे भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी पुणे लगतच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात उभारण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

21 व्या शतकातील भारत घडवण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाची गरज ओळखून भारताला समृद्ध बनविण्याचे स्वप्न व दूरदृष्टी देऊन हे परिवर्तन करण्यासाठी विज्ञान या विषयाचे अनन्य साधारण आहे. देशाच्या विकासासाठी आणि बौद्धिक पातळी वाढीसाठी देशात संगणक व इंटरनेटची सुविधा उभारण्यात आल्या. वैज्ञानिक दृष्टीकोन, तंत्रज्ञानाचा समाज उन्नतीसाठी उपयोग विचारात घेऊन राज्य स्तरावर विज्ञान अविष्कार नगरीची उभारणी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

Google Ad

21 व्या शतकातील कौशल्ये, जागतिक नागरिकत्व, उद्योग 4.0 , उद्योजगकता , वैज्ञानिक दृष्टीकोन बहु-अनुशासनातत्मक, अनुभवात्मक शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यासाठी राज्यात जागतिक दर्जाच्या भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरीची स्थापना करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे, भविष्यातील वैज्ञानिक घडविणे यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात 8 एकर जागा उपलब्ध असून त्यापैकी एक एकर जागेत यापूर्वी तेथे विभागीय पातळीचे विज्ञान केंद्र उभारण्यात आले असून उर्वरीत 7 एकर क्षेत्रफळावर जागतिक दर्जाचे विज्ञानातील विविध संकल्पनांवर आधारीत रु. 191 कोटीची vertical भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी पुढील पाच वर्षात उभारण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

26 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!