Google Ad
Editor Choice

Pune : कधीही बेड्स ताब्यात घेणार, तयारीत रहा! … पुणे महापालिकेच्या खासगी रुग्णालयांना सूचना!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१सप्टेंबर) : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी पुढच्या काही महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यादृष्टीने उपाययोजनाही सुरू करण्यात आल्या आहेत. पुणे महानगरपालिका कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. एकीकडे शहरात आरोग्य व्यवस्थेच्या पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर दिला जात असताना आता महापालिकेने शहरातल्या सर्व खासगी रुग्णालयांना पत्र पाठवलं आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कधीही रुग्णालयातले बेड्स ताब्यात घेतले जाऊ शकतात, त्यामुळे तयारीत रहा, अशा सूचना खासगी रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत.

▶️’10 टक्के बेड्स लहान मुलांसाठी ठेवा’

Google Ad

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यानही महापालिकेने शहरातले 80 टक्के बेड खासगी रुग्णालयांकडून ताब्यात घेतले होते. या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेता महापालिकेने 50 टक्के बेड्स कोरोनासाठी राखीव ठेवण्याची तयारी ठेवलीय. यापैकी 10 टक्के बेड्स हे लहान मुलांसाठी ठेवावेत, अशाही सूचनाही महापालिकेने रुग्णालयांना केल्या आहेत.

▶️कोरोना रुग्णांना तात्काळ दाखल करून घ्या’

रुग्णांची स्थिती पाहून अनेक रुग्णालय रुग्णांना दाखल करून घेण्यात टाळाटाळ करत असल्याची काही उदाहरणं समोर आली होती. त्यामुळे तिसऱ्या लाटेत रुग्णालयात येणाऱ्या सर्व कोविड रुग्णांना नकार न देता त्यांना तात्काळ उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठीही महापालिकेने सूचित केलं आहे. जेणेकरुन कोरोना बाधित रुग्णांना बेड्स अभावी उपचार मिळण्यास विलंब होणार नाही.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

71 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!