Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

नवीन वर्षच्या या तारखे पासून पिंपरी चिंचवड शहरातील शाळेचे हे वर्ग होणार सुरू … आयुक्तांनी दिले आदेश!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील शाळा सुरु करण्या संदर्भात आयुक्तांनी आदेश दिले आहेत. ९ वी ते १२ वी चे शाळा व महाविद्यालय दि . ०४ जानेवारी २०२१ पासून चालू करण्यात येणार आहे.

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची कोविड १९ साठी RT – PCR / रॅपिड अँटीजेन टेस्ट चाचणी करुन घेणे तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतीपत्र भरुन घेणे , शाळा सुरु करण्यापूर्वी शाळा निर्जंतुकीकरण ( सॅनिटायझेशन ) , तापमान मोजणीसाठीची गन , डिजिटल थर्मामीटर , हात धुण्याची व्यवस्था , सोशल डिस्टंसींग प्लॅन इत्यादी . गोष्टींची पुर्तता करणे तसेच शासनाने दिलेल्या अटी व शर्तीची पुर्तता करणेची अटीवर पिंपरी चिंचवड शहरातील शाळा सुरू करण्यात येणार आहेत.

Google Ad

अशा असतील मार्गदर्शक सूचना / अटी :-
१ ) शाळा सुरु करणेबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचेमार्फत दिनांक १० नोव्हेंबर २०२० रोजी निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना / अटी ( SOP ) चे पालन करणे बंधनकारक राहील . २ ) शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा सुनिश्चित करणेकामी Thermometer , Thermal Scanner | Gun , Pulse Oximeter , जंतुनाशक , साबण , पाणी इत्यादी आवश्यक वस्तूंची उपलब्धता असलेबाबत दक्षता घ्यावी .

३ ) शाळा वाहतूक सुविधांचे निर्जतकीकरण नियमित होत असलेबाबत व याबाबत उपाययोजना केली आहे किंवा नाही याचा शाळा व्यवस्थापनाने पडताळणी करणे आवश्यक राहील .
४ ) शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा – यांनी कोविड – १ ९ साठीची RTPCR चाचणी बंधनकारक असून चाचणीचे प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळेत दप्तरी ठेवणेत यावे .

५ ) वर्गखोली तसेच स्टाफरुम मधील बैठकव्यवस्था शारीरिक अंतर ( Physical Distance ) च्या नियमानुसार अनावी .
६ ) शाळेत दर्शनी भागावर ( Physical Distance ) , मास्कचा वापर इत्यादी संदर्भात दिर्शक सूचना Posters / Stickers असणारे लावले का ? शाळेच्या अंतर्गत व बाह्य परिसरामध्ये रांगेत उभे राहण्याकरिता किमान ६ फुट इतकी शारीरिक अंतर ( Physical Distance ) राखले जाईल याकरिता विशिष्ट चिन्ह लावली आहे का ? शारीरिक अंतर ( Physical Distance ) राखण्यासाठी येण्या व जाण्याचे वेगवेगळे मार्ग निश्चित करणा – या बाणाच्या खुणा केल्या आहेत का ? याबाबतची व्यवस्था शाळेने करणे आवश्यक राहील .

७ ) विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी सहमती शाळा प्रमुखांनी प्राप्त करुन घेण्यात यावी .
८ ) शाळेत व शाळेच्या परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परिस्थिती राखण्याकरीता शाळेचा परिसर दररोज नियमितपणे स्वच्छ केला जातो का ? स्वच्छतागृहांचे वारंवार निर्जतुकीकरण केले जाते याबाबतची शाळेच्या मुख्याध्यापकांनी खात्री करून घेणे आवश्यक राहील .

९ ) विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी शाळा वाहतुकीच्या वाहनांचे दिवसातून किमान दोन वेळा ( विद्यार्थी वाहनात बसण्याअगदोर व उतरल्यानंतर ) निर्जंतुकीकरण केले जाते का ? याची खातरजमा शाळा व्यवस्थापनाने करुन घेणेत यावी .तथापी , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची कोविड १९ साठी RT – PCR / रॅपिड अँटीजेन टेस्ट चाचणी करुन घेणे तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतीपत्र भरुन घेणे , शाळा सुरु करण्यापूर्वी शाळा निर्जंतुकीकरण ( सॅनिटायझेशन ) , तापमान मोजणीसाठीची गन , डिजिटल थर्मामीटर , हात धुण्याची व्यवस्था , सोशल डिस्टंसींग प्लॅन.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!