Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

मित्रांसोबत दारू पिताना झाले भांडण …डोक्यात बेसिन घालून मित्रांनीच केला खून!

महाराष्ट्र 14 न्यूज : आपल्याच जवळच्या मित्रांसोबत दारू पीत असताना त्यांच्यात झालेल्या भांडणात मित्रांनीच मित्राचा डोक्यात वॉश बेसिन घालून खून केल्याची घटना चिंचवड येथे रविवारी रात्री घडली . शुभम रणजित साठे ( वय २१ , रा . एकता हौसिंग सोसायटी , बापुजीबुवानगर , थेरगाव ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे . तर स्वप्नील ऊर्फ कृष्णा भारत कापुरे ( वय २० ) , अजय मोहन क्षीरसागर ( वय २० ) , ज्ञानेश सुनील थोरात ( वय २१ , सर्व रा . समता कॉलनी , पाण्याचे टाकीजवळ , थेरगाव ) या तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .

याप्रकरणी रणजित लक्ष्मण साठे यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली . रविवारी ( ता . ३० ) रात्री आठच्या सुमारास शुभम आणि त्याचे आरोपी मित्र चिंचवडगावातील ओरिएंटल सोसायटीशेजारील पत्र्याच्या शेडजवळ दारू पीत बसले होते . त्यावेळी त्यांच्यात भांडण झाले . आरोपींनी शुभमच्या डोक्यात वॉश बेसिनचे भांडे , दगड व टाइल्स मारली . यामध्ये गंभीर जखमी झाल्याने शुभमचा जागीच मृत्यू झाला . पोलिसांनी शुभमचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला .

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!