Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

काटेपूरम चौक ते मयूरनगरी कडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी … ‘आमदार लक्ष्मण जगताप’ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नगरसेवकांनी केली वचनपूर्ती!

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि. ०७ एप्रिल ) : नवी सांगवी-पिंपळे गुरव प्रभाग क्रमांक ३१ मधील काटेपुरम चौका कडून मयूरनगरी कडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचा प्रलंबित प्रश्न अखेर आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नगरसेवकांच्या पाठपुराव्याने यशस्वी रित्त्या मार्गी लागला आहे.

काटे पुरम चौक ते मयूरनगरी नेताजी नगर, गजानन नगर, विनायक नगर, कवडे नगर या भागाला जोडणारा हा रस्ता असून अनेक दिवस या रस्त्याचे काम रखडले होते. रस्ता खोदल्याने धुळीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता, पावसाळ्यात पाणी साठत होते. सदर रस्त्याचे काम तातडीने मार्गी लागावे यासाठी या भागातील नागरीक,जेष्ठ नागरीक व महिला वर्गाने सतत स्थानिक नागरसेवकांकडे पाठपुरावा केला तसेच नगरसेवक यांच्या माध्यमातून जागा मालकांना त्यांच्या जागेचा योग्य तो मोबदला मिळावा या प्रामाणिक हेतुने महापालिका आयुक्त व नगररचना विभागातील आधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत सदर ठिकाणच्या जागा मालकांना देण्यात येणारा मोबदला देण्याची तयारी महानगरपालिकेने दाखवली त्यामुळे जागा मालकांनी सदरच्या रस्त्याकरीता लागणारी जागा मनपाच्या ताब्यात दिली.

Google Ad

त्यामुळे स्मार्ट सिटी अंतर्गत येथील सीमेंट कॉंक्रिट चा पक्का रस्ता व प्रशस्त फुटपाथ लवकरच पुर्ण होईल. जागा मालकांनी सामंजस्याने चर्चेस प्रतिसाद देऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांचेही स्थानिक प्रतिनिधीं यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण होत असल्याने नागरिकांनाही समाधान व्यक्त केले आहे.

🔴 नवी सांगवी फेमस चौक येथे 1 BHK फ्लॅट भाड्याने देणे आहे.
संपर्क : – 8️⃣9️⃣9️⃣9️⃣2️⃣8️⃣4️⃣8️⃣9️⃣5️⃣

Google Ad

About the author

Maharashtra14 News

145 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!