Categories: Uncategorized

पिंपळे सौदागर येथे बहुमजली कमर्शियल इमारतीमधील कोचिंग क्लासेस मध्ये लागलेली भीषण आग अग्निशमन विभागाच्या पथकाने आणली आटोक्यात! … आगीं मधून सहा जणांची केली सुखरूप सुटका

*पिंपळे सौदागर येथे बहुमजली कमर्शियल इमारतीमधील कोचिंग क्लासेस मध्ये लागलेली भीषण आग अग्निशमन विभागाच्या पथकाने आणली आटोक्यात!*

*आगीं मधून सहा जणांची केली सुखरूप सुटका*

*पिंपरी, दि. १ डिसेंबर २०२५:* पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोड येथील “प्राइम स्क्वेअर” इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील एका प्रायव्हेट कोचिंग क्लासेस मध्ये आज दुपारी पावणे तीनच्या सुमारास अचानक आग लागली. अवघ्या काही मिनिटांत या आगीने रौद्र रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पिंपरी येथील मुख्य अग्निशमन केंद्रातील २ , थेरगाव उप अग्निशमन केंद्रातील १ आणि नेहरूनगर अग्निशमन केंद्रातील १ अग्निशमन पथकाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणत आगीमधून सहा जणांची सुखरूप सुटका केली.

अग्निशमन विभागाच्या पथकाने घटनास्थळी गेल्यानंतर त्वरित बचाव कार्यास सुरुवात केली. आगीच्या ज्वाळा आणि धूरामुळे जवानांना इमारतीमध्ये शिरकाव करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. परंतु जवानांनी साहस दाखवत इमारतीमध्ये प्रवेश करून इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आतमध्ये अडकलेल्या सहा जणांची सुखरूप सुटका केली. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या खाजगी कोचिंग क्लासेस मध्ये एकूण बेचाळीस विद्यार्थी होते. मात्र स्थानिकांनी अग्निशमन विभागास ताबडतोब थेट कॉल करण्यास दाखवलेली समयसूचकता आणि अग्निशमन विभागाने दाखवलेली तत्परता यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली व सुदैवाने मोठी दुर्घटना टाळण्यास अग्निशमन विभागास यश प्राप्त झाले.

या कारवाईमध्ये अग्निशमन विभागाचे वरिष्ठ अधिकारी ऋषिकांत चिपाडे, उप अग्निशमन अधिकारी विनायक नाळे, गौतम इंगवले, प्रभारी उपअधिकारी रुपेश जाधव, , वाहनचालक मयूर कुंभार, विशाल बानेकर, दत्तात्रय रोकडे, मारुती गुजर, अग्निशमन विभागाच्या महिला कर्मचारी स्नेहा जगताप यांच्यासह इतर जवान सहभागी झाले होते.
दरम्यान, अशा प्रकारच्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी १०१ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अग्निशमन विभागाकडून करण्यात आले आहे.

पिंपळे सौदागर येथील घटनेत स्थानिकांनी आणि अग्निशमन विभागाने दाखवलेली तत्परता ही कौतुकास्पद आहे. अग्निशमन दलाने दाखवलेले धैर्य, संयम आणि सतर्कता अत्यंत उल्लेखनीय आहे.
*- विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका*

संकटाच्या क्षणी योग्य वेळी दिलेला प्रतिसाद, शांतपणे घेतलेले निर्णय आणि दृढ मनोबल यामुळेच मोठा अनर्थ टळला. ही कारवाई आमच्या दलाच्या तयारीची आणि शहराच्या सुरक्षेच्या बांधिलकीची जिवंत साक्ष आहे.
*- व्यंकटेश दुर्वास, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका*

या आगीत संभाव्य नुकसानाची व्याप्ती खूप मोठी होती. सदर कमर्शियल बिल्डिंग मधील अन्य व्यवसायांच्या ग्राहकांची गर्दी असती तर आणि लगतच्या इमारतीमध्ये आग पसरली असती तर परिस्थिती वर नियंत्रण ठेवणे खूपच अवघड झाले असते. आमच्या नियंत्रण कक्षाला घटनेबाबत माहिती मिळाल्यापासून काही मिनिटांतच पथक रवाना झाले आणि पथकाने पूर्ण क्षमतेने काम केले आहे, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पिंपळे सौदागर परिसरात अग्निशमन केंद्राची नितांत आवश्यकता असून त्याबाबत वरिष्ठ स्तरावर कार्यवाही त्वरेने होणे आवश्यक असून आमच्या जवानांनी अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत ही आग आटोक्यात आणली आहे,
– *ऋषिकांत चिपाडे, अग्निशमन अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका*

Maharashtra14 News

Recent Posts

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

1 week ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

2 weeks ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

4 weeks ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

1 month ago

“खड्डा दिसला तर फोटो काढा, ठिकाण नोंदवा” … पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आतापर्यंत २,२४७ पैकी १,७३३ खड्डे बुजविले; उर्वरित खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

  महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १७ ऑगस्ट २०२६ :* पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाच्या अहवालानुसार,…

1 month ago