Google Ad
Editor Choice Pune

‘जितेंद्र सातव’ यांची कोविड-१९ रुग्णांकरीता अल्पदरात रुग्णवाहिकेची सेवा … गरजूंनी संपर्क करण्याचे केले आवाहन!

महाराष्ट्र 14 न्यूज : पुण्यात राहणारे जितेंद्र सुरेश सातव पुणे, पिंपरी चिंचवड भागात गेले ५/६ महिने होणारे रुग्णाचे हाल पाहत आहेत, त्यात त्यांना दिसून आले की, महत्वाच्या अगदी तातडीच्या वेळेस रुग्णवाहिका वेळेवर मिळत नाही ‘कोविड’ पेशंटकरता शासनाने दिलेली रुग्णवाहिका ही घरातून रुग्णालयात नेण्यासाठी येते, परंतु एका खाजगी रुग्णलयातून दुसऱ्या रुग्णालयात नेण्यासाठी खाजगी रुग्णवाहिका चे दर हे खूपच जास्त प्रमाणात असल्यामुळे गरीब रुग्णांना ते परवडणारे नाहीत.

हे ओळखूनच आपण समजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेने सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र सुरेश सातव हे या विचारांनी गेले १३ वर्ष आरोग्य सेवा या विषयात मदतीचा हात म्हणून काम करीत आहे. “रुग्ण सेवा, हीच ईश्वर सेवा” याच सामाजिक भावनेतून त्यांनी गरीब कोविड-१९ रुग्णांकरिता अल्पदरात रुग्णवाहिका चालू करण्याचा विचार केला आणि ‘नगरसेवक शशिकांत कदम’ यांच्या मार्गदर्शनाखाली तो प्रत्यक्षात आणला.

Google Ad

आरोग्य विषयात मदतीसाठी जितेंद्र सातव हे सदैव रुग्णांसोबत असतात, उदा– , रक्त तपासणी , सिटी स्काँन , एम आर आय , एक्स – रे , आशा अनेक प्रकारच्या तपासण्या अल्प दरात तसेच अनेक आजारावर हृदय विकार , अॅन्जोग्राफि , अँजोप्लास्टी , मेंन्दु , हडाचा , यांच्या वरील शस्त्रक्रिया त्वचेवरील अजार , काँन्सर यासारख्या अणेक आजारावर प्रत्येक आरोग्य विषयी लागणारी गरज व रुग्णवाहीका ही रुग्णाच्या आर्थिक परस्थीती नुसार अल्प दरात व परिस्थिती नसेल तर मोफत पुरवतात.

जितेंद्र सुरेश सातव म्हणतात, “समाजातील जास्तीत जास्त गरजू लोकांकरीता अल्पदरात हे कार्य करण्याचा माझा मानस आहे”.

अधिकमाहीती साठी संपर्क ;; ” जितेंद्र सुरेश सातव मोबाईल ७९७२४११९५३ , वाँटसप ९९२३०००३३१

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!