Google Ad
Editor Choice kolhapur

Kolhapur : थुंकीमुक्त कोल्हापूर करण्यासाठी उस्फूर्त प्रतिसाद … अँटी स्पीट मूव्हमेंटच्यावतीने चळवळीला प्रारंभ!

महाराष्ट्र 14 न्यूज : माझं कोल्हापूर थुंकीमुक्त झालंच पाहिजे… आपलं कोल्हापूर स्वच्छ सुंदर आपण ठेवलेच पाहिजे अशा घोषणामुळे ताराराणी चौक दुमदुमून गेला निमित्त होते ते म्हणजे अँटी स्पीट मूव्हमेंटच्या वतीने आयोजित केलेल्या जनजागृती मोहिमेचे.

आज सकाळी साडेनऊ वाजता सोशल डिस्टन्स पाळत अँटी स्पीट मूव्हमेंटचे कार्यकर्ते चौकात वेगवेगळ्या कॉर्नरवर उभे राहून घोषणा देत थुंकीमुक्त कोल्हापूर करण्याच्या चळवळीस प्रारंभ झाला यावेळी रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांना माहितीपत्रके वाटप करण्यात आली तसेच थुंकीमुक्त स्लोगन असलेले बॅनर आणि पोस्टर हातात धरून घोषणा देत असल्यामुळे चौकात एक वेगळा उत्साह आला होता या मोहिमेला लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. या मोहिमेतील आकर्षक पोस्टर्स आणि बॅनर्स सौ. संगीताताई मेंगाणे, संदेश वास्कर यांनी तयार केले होते.

Google Ad

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी थुंकून कोरोनाचा प्रसार वाढू नये तसेच ही अनिष्ट सवय दूर सारून शहर थुंकीमुक्त करण्याचा संकल्प यानिमित्ताने उपस्थितांच्यास वतीने करण्यात आला. थुंकीमुक्त कोल्हापूर बनवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या दीपा शिपूरकर आणि सारिका बकरे यांनी पुढाकार घेतला होता त्याला विविध सामाजिक संस्थांनी पाठबळ दिल्यामुळे आता ही चळवळ सर्वांची बनली आहे. आजच्या मोहिमेचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘दीपा शिपूरकर’, आनंद आगळगावकर, राहुल राजशेखर, कविता जांभळे, अभिजित गुरव, गीता हसुरकर,दिपक देवलापूरकर, भानुदास डोईफोडे, समीर पंडितराव,विजय धर्माधिकारी, कल्पना सावंत, स्मिता देशमुख, नीना जोशी, यांनी संयोजन केले.

🔴 सकारात्मक प्रतिसाद 🔴

सिग्नलला एक रिक्षा थांबली असता रिक्षाचालकाने पिचकारी मारली असता मोहिमेतील कार्यकर्ते ‘आनंद आगळगावकर’ यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी त्या रिक्षा चालकाला विनंती करून पिचकारी पुसण्याविषयी विनंती केली, त्या रिक्षा चालकाने सकारात्मक प्रतिसाद देऊन रिक्षातून उतरून पिचकारी कापडाने पुसली.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!