Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

ऊसतोड कामगाराचा मुलगा झाला पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीचा उपमहापौर!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपचे बहूमत आहे.त्यामुळे आज शुक्रवारी (ता.६) उपमहापौर निवडणुकीत त्यांचाच उमेदवार निवडून येणार हे स्पष्ट होते. तरीही विरोधी पक्ष राष्ट्रवादीने आपला उमेदवार या पदासाठी दिला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली असे सर्वाना वाटत होते. दरम्यान, केशव घोळवे यांना भाजपचा उमेदवार म्हणून घोषित केले होते, राष्ट्रवादीने मात्र यावेळी महिला नगरसेविकेला ही संधी देण्याचा विचार करून निकिता पवार यांचे नाव दिले,

भाजपचा उमेदवार ज्या पिंपरी विधानसभा मतदारसंघातील आहे, तेथीलच राष्ट्रवादीच्या निकिता पवार या नगरसेविकेला उमेदवारी देऊन ही निवडणूक रंगतदार करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न होता परंतु आज निकिता पवार यांनी अचानक आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरपदासाठी प्रथमच निवडून आलेले जुने भाजपचे कार्यकर्ते केशव घोळवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन ते पिंपरी चिंचवड च्या उपमहापौर पदी विराजमान झाले.

Google Ad

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पंकजा मुंडेंचे कट्टर समर्थक असलेल्या घोळवेंचे नाव सूचवून धूर्त खेळी केली आहे. यामुळे या पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांचा हिरमोड झाला. उपमहापौरपदासाठी केशव घोळवे यांच्या रूपाने कामगार नेते असलेल्या ऊसतोड कामगाराच्या मुलाला जुन्या एकनिष्ठ भाजपा कार्यकर्त्याला संधी दिल्याने तीन महत्वाच्या पदांचे वाटप शहरातील तीन विधानसभा मतदारसंघात समसमान झाले आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!