Google Ad
Editor Choice Technology

Solar Storm 2021 : मोबाईल नेटवर्क , GPS सिग्नल , वीज गायब होणार ? पृथ्वीला धडकतंय विनाशकारी सौर वादळ

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ जुलै) : सूर्याच्या उर्जेपासून तयार झालेलं एक विनाशकारी सौर वादळ तब्बल 16 लाख किमी वेगाने पृथ्वीला धडकण्याची शक्यता आहे. येत्या एक-दोन दिवसात हे वादळ पृथ्वीला धडकण्याची शक्यता असून त्यामुळे काही काळासाठी सॅटेलाईट सिस्टिम आणि इतर सेवा बंद पडू शकतात. या विनाशकारी सौर वादळामुळे रेडिओ सिग्नल, मोबाईल नेटवर्कमध्ये अडथळा येणार असून काही शहरांतील वीज पुरवठ्यामध्येही अडथळा येणार आहे. 1989 सालानंतर, म्हणजे 32 वर्षांच्या नंतर पुन्हा एकदा पृथ्वीवर अशा प्रकारचे सौर वादळ धडकणार आहे.

नासाच्या अंदाजानुसार, हे सौर वादळ पृथ्वीकडे 16 लाख किमी प्रति तास वेगाने येत आहे. यापेक्षाही जास्त वेग असू शकतो. त्याचा परिणाम वातावरणावरही होणार आहे. तसेच जगातल्या अनेक शहरातील वीज पुरवठा काही काळ बंद पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

Google Ad

या विनाशकारी वादळामुळे पृथ्वीचे बाह्य वातावरण गरम होऊ शकते. त्यामुळे जीपीएस, नेव्हीगेशन, मोबाईल फोन, सॅटेलाईट सिग्नलमध्ये अडथळा येऊ शकतो. तसेच वीज पुरवठ्यामधील वीज प्रवाह गतीशील होऊ शकतो. स्पेसवेदर डॉट कॉम या वेबसाईटच्या मते, या सौर वादळामुळे उत्तर किंवा दक्षिण धृवावर मोठा प्रभाव दिसण्याची शक्यता आहे. या ठिकाणी रात्रीच्या वेळी दिवसासारखा प्रकाश दिसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

▶️1989 साली अशा प्रकारचे सौर वादळ
सन 1989 साली अशाच प्रकारचं एक सौर वादळ पृथ्वीला धडकलं होतं. त्यामुळे कॅनडातील क्युबेक शहरातील वीजपुरवठा 12 तासांसाठी बंद झाला होता. तसेच यामुळे लाखो लोकांना अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. त्या आधी 1859 साली, आतापर्यंतचे सर्वात शक्तीशाली जीओमॅग्नेटिक वादळामुळे युरोप आणि अमेरिकेतील टेलिग्राफ व्यवस्था बंद पडली होती.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!