Google Ad
Agriculture News Editor Choice

भेटा जगातल्या सर्वात लहान आकाराच्या गायीला … एवढ्या लहान आकाराची गाय तुम्ही कधी पाहिली आहे का ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२जुलै) : ( माझी शेती ) गायीचे प्रत्येकाच्या मनात एक चित्र असते. देशभर अनेक जातींच्या गायी आहेत. काहींची उंची जास्त असते, तर काहींची मध्यम. पण आज आम्ही ज्या गायीची माहिती सांगणार आहोत, ती वाचून तुम्हाला पण आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. बांगलादेशातील ढाका जवळील चारीग्राम येथे राणी नावाची एक गाय आहे. सध्या तिच्याबद्दल जगभर कुतूहल आहे. ढाक्याला जाणारे पर्यटकही खास करून या गायीला बघायला जात आहेत. आता तुम्ही म्हणाल की या गायीमध्ये काय खास आहे. तर, या गायीचे वैशिष्ट्य म्हणजे ही गाय फक्त ५१ सेंटीमीटर इतक्या उंचीची आहे तर तिचे वजन हे या अवघे २६ किलो आहे.

राणी नावाची ही गाय जगातील सर्वात लहान आकाराची गाय असल्याचे बोलले जात आहे.

Google Ad

याच कारणाने बांगलादेशात लॉकडाऊन असूनही या गायीला पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडत आहे. या गायीची निगा राखणारे हसन हवालदार यांच्यामते दूरवरून लोक या गायीला पाहण्यासाठी येत आहेत. तब्बल १५,००० लोक या गायीला बघून गेले आहेत. ते सांगतात की, ‘लोकांच्या या गर्दीला आम्ही पण त्रासलो आहोत.’

या गावाच्या आजूबाजूला असलेले लोक पण सांगतात की अशी गाय आम्ही आजवर पाहिलेली नाही. राणी ही गाय मूळ भूतानची असून तिला बंगालमधून बांगलादेशात नेण्यात आले आहे. या गायीची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने पण घेतली आहे. ही गाय जगातली सर्वात लहान गाय आहे या दाव्याची तपासणी करण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारी येणार आहेत.

या गायीवर लोकांनी मात्र प्रेमाचा वर्षाव केला आहे. अतिशय सुंदर वाटणारी ही गाय पाहण्यासाठी म्हणूनच गर्दी होत आहे. तर सोशल मिडीयावरही या गायीचे फोटो व्हायरल होत आहेत

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!