Google Ad
Editor Choice

‘मारुती तरटे’ यांचे सामाजिक कार्य … सॅनिटायझर आणि मास्क वाटून केला अनोख्या पद्धतीने वाढदिवस!

महाराष्ट्र 14 न्यूज : नवी सांगवी येथील सामाजिक कार्यकर्ते मारुती तरटे यांनी आपला वाढदिवस साजरा न करता आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आजही आपण काही ना काही समजाला देणे लागतो या आचरणाने, सॅनीटायझर आणि मास्क देऊन कोरोना योद्धयांना गौरविण्यात आले. यामध्ये आपले कोरोना योद्धे त्यात डॉक्टर, नर्स तसेच महागरपालिकेचे आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी,कर्मचारी यांचा सहभाग दिसून आला.

यावेळी बोलताना मारुती तरटे म्हणाले, की आहोरात्र आपला जिव धोक्यात घालून डॉक्टर,नर्स हे लोक आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत असतात, तर आपले आरोग्य कर्मचारी आपला परिसर स्वच्छ, निर्मळ, निरजंतुक कसा होईल याचे काम करतात. म्हणून मित्रहो,माझ्या मते तरी खरे कोरोना योद्धे हे आहेत. म्हणून माझ्या जन्मदिनी मी जय गुरुदेव दत्ताला एवढीच प्रार्थना करेल की,या कोरोना योद्धयांना दिर्घायुष्य लाभू दे ….

या प्रसंगी उपस्थित डॉक्टर,नर्स आणि महागरपालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी डवरी आणि महागरपालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

1,627 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!